प्रतिष्ठीत व्यक्तीची सोशल मिडियाच्या माध्यमातून बदनामी केल्याप्रकरणी एका युट्युब चँनेलच्या पत्रकारांवर गून्हा दाखल

प्रतिष्ठीत व्यक्तीची सोशल मिडियाच्या माध्यमातून बदनामी केल्याप्रकरणी एका युट्युब चँनेलच्या पत्रकारांवर गून्हा दाखल. या संदर्भातील अधिक मिहीती अशी की.


समाजातील प्रतिष्ठीत व भारतीय जनता पक्षाचे नेते अशी व्यक्तीमत्व असणारे श्रीनिवास संगा यांची सोशल मिडीयावर खोटी बातमी बनवून समाजात बदनामी केल्याप्रकरणी श्रीनिवास संगा यांनी स्वतः दिलेल्या फिर्यादीवरुन बालाजी नल्ला व शिवबाराजे युट्युब चॅनेलचे संपादक निरंजन बोध्दुल रा.सोलापूर यांच्या विरोधात जेलरोड पोलीस ठाण्यात गून्हा दाखल झाला आहे.याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, अरोपी 1)बालाजी नल्ला 2) निरंजन बोध्दुल सोलापुर यांनी दि. 20/03/2025 रोजी 22.30 वा चे सुमारास फिर्यादी यांनी अरोपी यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय केलेला नाही, त्यांच्या पत्नी सोबत फिर्यादी यांचे काहीएक संबंध नाही, तसेच फिर्यादी यांची ओळख कोणत्या नेत्याशी आहे याबाबत काहीएक माहीती नाही. परंतु तो विनाकारण फिर्यादीविरुध्द बदनामीकारक व्हीडीओ तयार करून ते युट्यूब चॅनेचच्या माधयमातुन प्रसारीत करत बालाजी नल्ला व निरंजन बोध्दूल यांनी फिर्यादी श्रीनिवास संगा यांच्या बाबत कोणतीही खातरजमा न करता, प्रसारीत केली आहे. त्यामुळे फिर्यादी यांना मानसिक त्रास होवुन जनसामन्यामध्ये फिर्यादीची बदनामी केली,अशी फिर्याद श्रीनिवास संगा यांनी दिली.त्यांच्या फिर्यादीवरुन बालाजी नल्ला व निरंजन बोध्दूल यांच्या विरोधात जेलरोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय सहिता कलम ३५६(२) व ३ (५) प्रमाणे जेलरोड पोलीस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला या घटनेचा अधिक तपास जेलरोड पोलीस ठाण्याचे पोहेक चव्हाण व पोहेक कांबळे हे करीत आहेत.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *