२५१ सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात वंचित चे संतोष सेवू पवार यांचाच बोलबाला ..

२५१ सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात वंचित चे संतोष सेवू पवार यांचाच बोलबाला ..

२५१ सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष सेवू पवार यांना शहरी आणि ग्रामीण भागात वाढता पाठिंबा मिळत आहे. संतोष पवार हे सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे एक युवा नेतृत्व असून, मतदारसंघात त्यांची प्रचारात आघाडी घेतली आहे.

यावेळी चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे, ज्यात अपक्ष धर्मराज काडादी, शिवसेना (उबाठा) चे अमर पाटील, भाजपचे सुभाष देशमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे संतोष पवार यांच्यात तीव्र स्पर्धा आहे. विशेषतः ग्रामीण भागात संतोष पवार यांचे गेली २/३ वर्षातील सक्रिय कार्य पाहता त्यांना जास्तीत जास्त लोकांचा पाठिंबा मिळत असून, शहरी भागातही त्यांची असलेली दमदार छबी, युवा, निर्व्यसनी आणि वकृत्वात, नेतृत्वात कार्यकुशल असलेला नवोन्मुख चेहरा म्हणून मतदारांमध्ये त्यांची ओळख असून विजयाबद्दल आत्मविश्वास वाढत आहे.

संतोष पवार यांच्या प्रामाणिक आणि संघर्षशील प्रवृत्तीमुळे विविध समाजघटक त्यांच्याभोवती एकत्र येत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात विकासाचे नवे अध्याय लिहिले जातील अशी अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर मतदारसंघात संतोष पवार यांच्या विजयाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *