झुकेगा नही साला; अल्लू अर्जुनला अटक! बायकोला गळाभेट घेत पोलीस गाडीमध्ये

झुकेगा नही साला; अल्लू अर्जुनला अटक! बायकोला गळाभेट घेत पोलीस गाडीमध्ये

हैद्राबाद पोलिसांनी साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक केल्याची माहिती समोर येत आहे. चित्रपट प्रदर्शनावेळी चेंगराचेंगरी प्रकरणात ही अटक करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हैदराबादच्या संध्या थिएटर प्रकरणी ‘पुष्पा 2’ अभिनेता अल्लू अर्जुनवर ही कारवाई करण्यात आली आहे.
चार डिसेंबर रोजी चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली होती, ज्यामध्ये 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण जखमी झाले होते. मयत महिलेला 25 लाखाची मदत देखील अल्लू अर्जुन ने केली होती मात्र घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी अल्लू अर्जुन आणि थिएटर व्यवस्थापनावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता पोलिसाांकडून अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे.
अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा २ द रूल’ या चित्रपटाने आणखी एक मैलाचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाने जगभरात एक हजार कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट आता एक हजार कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे. मंगळवारपर्यंत या चित्रपटाने ९५० कोटींची कमाई केली होती. पण, आता एक सोशल मीडिया पोस्ट समोर आली आहे, ज्यात चित्रपटाने एक हजार कोटींची कमाई करणार असल्याचे म्हटले आहे.

पुष्पा २’ हिंदी भाषेत सर्वाधिक कमाई करत आहे. मंगळवारच्या सुरुवातीच्या अहवालानुसार चित्रपटाच्या कमाईत किंचित घट होणार आहे. पण, हा सिनेमा आपले नाव कमावणार आहे. सुकुमार दिग्दर्शित आणि मैथरी मूव्ही मेकर्स आणि मुत्तमसेट्टी मीडिया निर्मित या चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल यांनी पुष्पा राज, श्रीवल्ली आणि भंवर सिंह शेखावत या भूमिका साकरल्या आहेत.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *