दक्षिण सोलापुरातील शंकर नगर तांडा येथे एसटीचा अपघात अपघातात सुदैवाने जीवितहानी मात्र बस चे मोठे नुकसान

दक्षिण सोलापुरातील शंकर नगर तांडा येथे एसटीचा अपघात अपघातात सुदैवाने जीवितहानी मात्र बस चे मोठे नुकसान

 

दक्षिण सोलापूर तालुक्यातील शंकरनगर येथे महाराष्ट्र राज्याचे लालपरी म्हणून ओळख असलेल्या एसटी महामंडळाच्या बसचा निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे अपघात झाल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे.
सदर बस चालक वसंत ठाकरे हे कुसुर कडून सोलापूर कडे निघाले होते नुकताच शंकर नगर तांडा येथे झालेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे हा अपघात सकाळी 11/30 वाजण्याच्या सुमारास झाला असुन या अपघातात एसटी महामंडळाच्या महिला वाहक सुवर्णा अशोककुमार ढाले यांच्या समवेत काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे.
परंतु एसटी बस मात्र मोठे नुकसान झालेल्या माहिती समोर येत आहे.
मात्र सदर अपघाताच्या ठिकाणी सुदैवाने जीवित हानी झाली नाही.
परंतु सदर अपघात हा निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे झालेची माहिती स्नेक तुफान सर्पमित्र मधुकर राठोड यांनी सदर ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी लोकप्रधान न्युज चॅनल शी च्या माध्यमातून प्रशासनाकडे केली आहे.
सदर‌ घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शंकरनगर तांड्याचे सरपंच सुभाष चव्हाण पोलिस पाटील अशोक राठोड स्नेक तुफान तथा सर्पमित्र मधुकर राठोड तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रवि राठोड यांच्यासह शंकरनगर तांडा येथील ग्रामस्थ मंडळींना अपघातात अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.
किरकोळ जखमी प्रवाशांना ग्रामस्थांचा मदतीने उपचारासाठी पुढे पाठविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *