गौतम अदाणी महाराष्ट्राचे भविष्य घडविण्याचा प्रयत्न करतात – संजय राऊत
ऑन वन नेशन वन इलेक्शन
– 2029 पर्यंत नरेंद्र मोदी प्रधानमंत्री राहतील का, हा माझा प्रश्न आहे. या देशामध्ये लोकशाही स्वातंत्र्य पुर्ण मोडून उद्धस्त करण्याच्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये वन इलेक्शन वन इलेक्शन नेशन ही त्यांची संकल्पाना आहे ज्या देशामध्ये संघ राज्यपद्धती आहे प्रत्येक राज्याची सामाजिक, तिकडच वातावरण वेगळ आहे जम्मु मध्ये नॅार्थ मध्ये तुम्ही निवडणूका घेवू शकत नाही, काही राज्यात सात -सात टप्प्यात निवडणूका घेतायत फक्त तुमची व्यवस्था आणि सोय पाहण्यासाठी तुमचा स्वार्थासाठी या निवडणूका घेता
– राज्यांचे प्रश्न वेगळे असतात आणि लोकसभेत राष्ट्रीय प्रश्न वेगळे असतात आणि त्या नुसार लोकांनी विचार पुर्वक मतदान करायचं असतं हे गेल्या आपण 70-75 वर्ष बघतोय
– अद्याप मुंबई महापालिकेच्या निवडणूका अजून घेऊ शकले नाही वन नेशन वन इलेक्शन वाल्यांनो या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्या संस्थेच्या निवडणूका यासाठी घेतल्या नाही कारण हरण्याची भिती आहे. त्यामुळे जे बिल कॅबिनेटनी आणले मंजूर केले पण 2029 ला मी फार जवाबदारीने बोलतोय लोकांवर टीका करतो, वन नेशन वन इलेक्शन निवडणूक हा खंडा आहे त्यामुळे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री असतील का ही शंका आहे त्यांच्याकडे बहुमत आहे , त्यांना पक्ष फोडण्याचा आणि बहुमत प्राप्त करण्याचा अनुभव आहे ज्यांनी ज्यांनी देशाच्या संविधानावर संघराज्यावर हल्ला केलेला आहे त्यांना इतिहासाने माफ केलेलं नाही
ऑन महापालिका निवडणूका
– कधी लागूद्या शिवसेनेने मुंबई सह 14 महापालिकेच्या निवडणूकांची तयारी केलेली आहे आणि आम्ही अत्यंत ताकदीने या निवडणूका लढू तीन साडेतीन वर्ष या निवडणूका रखडवून ठेवल्या
– मुंबईला महापौर दिला नाही कारण त्यांना हरण्याची भीती होती
– वामा मार्गाने आम्ही विजय प्राप्त करू शकतो आणि त्या खात्री त्यांना पटली आहे
– मुंबईत मराठी माणूस राहावा, मुंबई मराठी माणसाची राजधानी राहावी यासाठी आम्ही प्राणाची बाजी लावून लढणार आहोत
ऑन-अजित पवार & शरद पवार भेट
– अजित पवार बरोबर जाणार आणि भाजप सोबत जाणार हे एकच आहे
– मी शरद पवार यांना ओळखतो जवळजवळ मी रोजच असतो त्यांच्यासोबत, संसदेत राज्यसभेत त्यांची आणि माझी बसण्याची जागा बाजू-बाजूलाच आहे
– कुणीतरी फार ठरवून हे जागावाटप केलेलं आहे
– धर्मांथ शक्ती पासून दूर राहण्याचा विचार यशवंतराव चव्हाण पासून या महाराष्ट्रात बिंबविण्याचा प्रयत्न केला अशा पासून शरद पवार दूर जातील असं मला वाटत नाही
– या संदर्भात गौतम अदाणी मध्यस्थी करत आहे
– त्यांच्या घरी सध्या राजकीय चर्चा होतात
– महाराष्ट्राचे भविष्य घडविण्याचा ते प्रयत्न करतात
– हे गौतम अदानी महाराष्ट्राचे सामाजिक आणि राजकीय भवितव्य घडवणार आहेत
– ते दादा धर्माधिकारी आहेत का? विनोबा भावे आहेत का ?ते यशवंतराव चव्हाण आहेत का ?
– एक उद्योगपती नरेंद्र मोदींचा मित्र आहे तो महाराष्ट्रात राजकारण करणार महाराष्ट्राचा भवितव्य ठरविणार आणि हे मुंड्या खाली घालून त्यांच्या घरी बसत आहेत त्यांना लाज वाटली पाहिजेत स्वतःला मराठी म्हणून घ्यायला
– अजित पवार गटाला मंत्रिपद यासाठी नाही की प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार गटाला सांगितल आहे की पवार यांचे पाच खासदार फोडून घेवून या तेव्हा सहाचा कोटा पुर्ण होईल नंतर मंत्रिपद मिळेल
– शरद पवारांनी कष्टाने निवडून आणलेले खासदार आताही लोक फोडत आहेत फुटणाऱ्याला शरम वाटले पाहिजे
– मी जे हे पाप केलं असतं तर माझ्यामध्ये हिम्मत नसते बाळासाहेब यांच्या नजरेला नजर मिळविण्याची
– मला वाटत नाही ते नोटरीचेबल असतील सर्व खासदार शरद पवारांच्या बंगल्यावर होते ..
– जे कोणी असा विचार करत असतील तर ते पवारांशी बेईमानी करत नाहीत तर महाराष्ट्राची बेईमानी करतील
– मध्यस्थी करण्याचा प्रयत्न असेल आणि पक्ष फोडण्याचा प्रयत्न असेल ही दुधारी तलवार आहे
– या राज्यात जे हुकूमशहा तयार झाले त्यांचा अंत फार वाईट झालेला आहे
ऑन महाविकास आघाडी अस्वस्थता
– त्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडे काळा पैसा आहे त्यांच्याकडे पोलीस, सीबीआ,इन्कम टॅक्स अशा यंत्रणा आहेत त्यामुळे अशा प्रकारचे दावे ते करू शकतात
– या यंत्रणा आमच्याकडे असत्या तर अख्खा भाजप आम्ही 15 मिनिटात खाली केला असता
– बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा. निवडणुकांची मतमोजणी सुरू होताच अर्धे भाजप वाले देश सोडून पळून जातील
– आम्ही तुरुंगवास भोगले. रक्त सांडलं आता आम्ही सभ्य झालो आहोत. आम्हाला पुन्हा आवाहन देऊ नका
– मुंबईसाठी 105 हुतात्मा द्यायची तयारी उद्धव ठाकरेंची आहे. पाहिला हुतात्मा तेव्हा मी असेल
ऑन महापालिका निवडणूक
– आत्तापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या युती किंवा आघाडीमध्ये लढल्या गेलेल्या नाहीत
– आम्ही कोणताही निर्णय घेताना तीन पक्ष एकत्र बसून घेतो आम्ही जो निर्णय घेऊ तो निर्णय घेताना माननीय उद्धव ठाकरे ,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस तीन पक्ष एकत्र बसून घेऊन
ऑन मंत्रिमंडळ विस्तार
– काही लोकांना मंत्रिमंडळ विस्ताराच्या बदल्यात हृदयविकाराचा झटका नाही मिळाला म्हणजे झालं ,रुग्ण वाहिका ठेवल्या पाहिजेत
– शिंदे यांच्या नाराजीला कोण विचारतं. त्यांचा आनंद किंवा त्यांची नाराजी हा विषय दिल्लीसाठी संपलेला आहे .
– हे सर्व कळसूत्री बाहुली आहेत
– हे सर्व गुलाम आहेत गुलामाना बंडाची भाषा शोभत नाही ,त्यांनी बलिदानाची तयारी ठेवली पाहिजे पण ते डरपोक लोक आहेत
ऑन राहुल गांधी भारत जोडो यात्रा
– आम्ही आरजक पसरविणारे लोक नाही
– अमोल पालेकर अनेक अधिकारी, वकील,डॉक्टर लोक भारत जोडो यात्रात होते
– अभ्यास करा रिसर्च करा फडणवीस तुम्ही evm मधून बनलेले मुख्यमंत्री आहेत
Leave a Reply