पेनाचे टोपण तोंडात अडकल्याने जिल्हा परिषद शाळेतील मुलीचा दुर्दैवी मृत्यू
पेनाचे टोपण गिळल्याने पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धुळे तालुक्यातील निमखेडी जिल्हा परिषद शाळेत ही धक्कादायक घटना घडली आहे. पेनाचे टोपण श्वसनलिकेत अडकल्याने अर्चना खैरनार या सात वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अर्चना खैरनार हिने गिळलेले पेनाचे टोपण काढण्याचा प्रयत्न शिक्षकांनी केला. तर त्यांना त्यात यश आले नाही. अखेर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी अर्चना खैरनार हिला मृत घोषित केले. अर्चना खैरनार या सात वर्षीय विद्यार्थिनीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे निमखेडी गावात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
Leave a Reply