आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी सोलापुरातील सोशल महाविद्यालयात एकत्र आले विविध देशातील तज्ज्ञ : समकालीन विषयांवर मंथन

आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी सोलापुरातील सोशल महाविद्यालयात एकत्र आले विविध देशातील तज्ज्ञ : समकालीन विषयांवर मंथन

शोलापूर : सोलापुरात विविध देशातून मान्यवरांनी हजेरी लावली झिम्बाब्वे देशाचे कुडझाई गांडा, आफ्रिका खंडातील चाड रिपब्लिक देशाचे अली अस्सफी महमत,आणि बांग्लादेशातून नइमा सुलताना मीम आणि सादिया आफ्रिन मऊमी यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रत्यक्ष सहभाग नोंदवून उपस्थितांना मार्गदर्शन केले. निमित होते शोलापूर सोशल असोसिएशनच्या आर्ट्स अॅतण्ड कॉमर्स कॉलेज, सोलापूर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) व वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागाच्या वतीने आणि नवी दिल्ली येथील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, टेक्नॉलॉजी अॅरण्ड इनोव्हेशन ट्रस्टच्या सहकार्याने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेचे. “वाणिज्य, व्यवस्थापन, कला, मानवशास्त्र, अभियांत्रिकी, संगणकशास्त्र व अनुप्रयोग यातील समकालीन प्रश्न” या व्यापक विषयावर एक भव्य आंतरराष्ट्रीय परिषद दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी सोशल महाविद्यालय सोलापूर येथे आयोजित करण्यात आली. उदघाटन सत्रात झिम्बाब्वे देशाची कुमारी कुडझाई गांडा यांनी संशोधनातुन शाश्वत विकास साधण्यासाठी जागतिक स्तरावर काय प्रयत्न करावे लागतील या विषयावर मार्गदर्शन केले. आफ्रिका खंडातील चाड रिपब्लिक देशाचे अली अस्सफी यांनी जगात कॉम्पुटर क्रांती झाली कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) मोठ्या प्रमाणावर विकास झाला परंतु त्याचा फायदा गरीब देशांना होत नाही त्या दृष्टीने प्रयत्न होण्याची गरज विशद केली. बांग्लादेशातून आलेल्या नइमा सुलताना मीम आणि सादिया आफ्रिन मऊमी यांनी कोणत्याही देशाच्या विकासासाठी आवश्यक मनुष्य विकास निर्देशांक व त्यामध्ये संशोधनाची गरज या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. ऑनलाइन माध्यमातून नजेरियाचे श्री सगुन सोलोमन CEO मेड्रॉस टेकनोलॉजि यांनी आपल्या मार्गदर्शनपर बीज भाषणात बदलती जागतीक अर्थव्यवस्थेचे स्वरूप या विषयावर मार्गदर्शन केले. नुकतेच सत्र न्यायाधीश परिक्षा पास झालेली महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी ऍड्वकेट मुंजरीन जेलर यांनी जागतिक स्तरावरील बौद्धिक बुद्धिमत्ता IPR कायदे या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेत मार्गदर्शन केले. या परिषदेस विविध देशातील मान्यवर उपस्थित होते. हि आंतरराष्ट्रीय परिषद प्रत्यक्ष व ऑनलाइन (हायब्रिड) दोन्ही पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. या परिषदेमध्ये देश-विदेशातील विविध विद्यापीठांमधील एकूण २१० प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी, आणि तज्ज्ञांनी सहभाग घेतला. परिषदेमध्ये विविध क्षेत्रांतील चालू घडामोडी, नविन तंत्रज्ञान, संशोधन, आणि शैक्षणिक दृष्टीकोनांवर सखोल चर्चा करण्यात आली. या आंतराष्ट्रीय परिषदेत सादर करण्यात आलेल्या शोधनिबंधाचे आंतराष्ट्रीय पत्रिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जागतिक परिषदेचे अध्यक्ष म्हणून सोशल महाविद्यलयाचे प्राचार्य डॉ. आय जे तांबोळी होते व समन्वयक प्रा डॉ जैनोद्दीन मुल्ला हे होते. दुसऱ्या सत्रामध्ये वाणिज्य व व्यवस्थापन, मानववंशशास्त् व भाषा या विषयावर एकूण 102 शोधनिबंध सादर करण्यात आले. या सत्राचे अध्यक्ष म्हणून सोलापूर विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा डॉ आयेशा रंगरेझ, विद्यापरिषद सदस्य प्रा डॉ शिवानंद भांजे, प्रा डॉ गौस शैख व मुंबई विद्यापीठाचे ऍड नायर सर यांनी काम पाहिले. समारोप सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ बब्रुवाहन रोंगे प्राचार्य व संथापक सचिव स्वेरी पंढरपूर यांनी उपस्थितांना स्टार्टअप व युवकांची भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले. समारोप सत्राचे अध्यक्ष IMTE नवी दिल्ली संस्थेचे विश्वस्थ प्राचार्य डॉ अन्वर शेख होते. सन्माननीय वक्ते आणि संयोजकांनी या कार्यक्रमाची प्रशंसा केली असून विद्यार्थ्यांना यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर विचारांची देवाणघेवाण करण्याची आणि आपल्या ज्ञानाचा व्याप्ती वाढवण्याची संधी मिळाली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सोशल महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. आय. जे. तांबोळी, परिषदेचे संयोजक सोलापूर विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा. डॉ. जैनोद्दीन मुल्ला, प्राचार्य डॉ. अन्वर शेख, सबा शेख, प्रा. डॉ. अस्मा खान, प्रा. डॉ. जी. एन. शेख, प्रा. डॉ. एस. ए. राजगुरू, प्रा. डॉ. टी. बी. लडाफ, प्रा. डॉ .डी. एस. नारायणकर, प्रा फारुख शेख, प्रा. एम. डी. शेख, प्रा रहीसा मिर्झा, प्रा सादिक शिपाई, डॉ. एस. ए. इनामदार, डॉ. ए. ए. बिजापुरे, डॉ. एस. बी. मिटकरी, महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. ही परिषद शिक्षण व संशोधन क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणारी आहे, असे मत विविध मान्यवरांनी व्यक्त केले.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *