सोलापूर पाटबंधारे विभागाचा ढिसाळ कारभार व चुकीचे नियोजन-शेतकरी मात्र चिंतेत!.
मोजे तिर्हे गावातून सीना नदी पात्र असून या नदीपात्रामधून तिर्हे व आजूबाजूच्या चार-पाच गावातील शेतकरी वर्गास, लोकांना पिण्यासाठी, जनावरांना पिण्यासाठी पाण्याची सोय होत असते. परंतु पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता व भीमा पाटबंधारे विकास विभाग क्रमांक दोन चे कार्यकारी अभियंता यांच्या चुकीच्या नियोजनामुळे शिंगोली बंधार्यातील पाणीसाठा कमी होऊन सर्व शेतकऱ्यांवर अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. या बाबत येथील सर्व शेतकऱ्यांनी संबंधित पाटबंधारे विभागास पाण्याची अडचण गंभीर असून तात्काळ पाणीपुरवठा करण्याची मागणी देखील केली. व पाणीपुरवठा न झाल्यास सर्व शेतकरी हे नाईलाजाने बेमुदत उपोषण आंदोलन करतील असे लेखी स्वरूपात कळविले होते.
त्यावर लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर येथील कार्यकारी अभियंता यांनी कार्यकारी अभियंता भीमा विकास विभाग क्रमांक दोन यांच्याशी चर्चा करून दिनांक 12- 5 -2025 पासून जनावरांच्या सोयीकरिता व शेतकऱ्यांना शेतीसाठी भीमा उजनी प्रकल्पाच्या उजनी डाव्या कालव्याच्या कुरुल कालव्याद्वारे सीना नदीपात्रात पाणी सोडणार असल्याचे लेखी पत्र देऊन दिनांक 12- 5 -2025 नदीपात्रात पाणी न सोडता शेतकऱ्यांची फसवणूक व थट्टा करण्याचा प्रयत्न केला आहे. या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजन, अंदा धुंद कारभारामुळे पुन्हा 13/05/2025 रोजी शेतकऱ्यांनी सिंचन भवन सोलापूर येथे पाण्यासाठी आंदोलनास सुरुवात केली त्यावेळी माननीय आमदार सुभाष बापू देशमुख यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली यामध्ये सीना नदी पात्रात शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्याचे ठरलेले आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या चुकीच्या व ढिसाळ, अंधाधुंद कारभाराचा शेतकरी वर्गातून निषेध व्यक्त करण्यात आला.
Leave a Reply