मान्सून पुन्हा सक्रिय होणार; आठवडाभर जोरदार पाऊस

सोलापूर : गेल्या १५ दिवसांपासून थंडावलेला व केवळ पुणे-मुंबईपर्यंतच पोहोचलेला मान्सून आता सक्रिय होऊन पुढ े झेपावण्याची शक्यता निर्माण झाल्याच े निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळ े यांनी सांगितले. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात आजपासून आठवडाभर म्हणज े गुरुवार १९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते. त्यापुढेही २-३ दिवस पावसाच े सातत्य टिकून राहणार आहे. मराठवाड्यातील सर्व आठ जिल्ह्यांत शुक्रवारी, शनिवारी दोन दिवस मध्यम पावसाची शक्यता जाणवते. त्यातही बीड, धाराशिव, मान्सूनपूर्व पावसान े दमदार हजेरी लावल्यानंतर जूनच्या पहिल्या लातूर, नांदेड, परभणी या जिल्ह्यात एखाद्या दिवशी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
आठवड्यात खंड पडला होता. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात काही भागात हलक्या सरी कोसळल्या. मात्र, उद्यापासून मान्सून पुन्हा जोर धरणार असल्याचे हवामान विभागाकडूनही स्पष्ट करण्यात आले आहे. मे मध्य े झालेल्या मान्सूनपूर्व दमदार पावसान े जमिनीत मोठ्या प्रमाणात ओल निर्माण झाली आहे. चार-पाच दिवसाच्या खंडात शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागती उरकून घेतल्या आहेत. काही विभागात खरीप पेरणीला सुरुवात देखील झाली आहे. उद्यापासून सर्वत्र पाऊस सुरू झाल्यास खरीप पेरणीला खोळंबा होईल, असे दिसत आहे.
Leave a Reply