शिवसेनेनंतर पंढरपुरात भाजप कार्यकर्त्यांची दबंगगिरी; RTO अधिकाऱ्यांसमोरच घातला गोंधळ, आमदार आवताडेंनी फोन केला अन्..

शिवसेनेनंतर पंढरपुरात भाजप कार्यकर्त्यांची दबंगगिरी; RTO अधिकाऱ्यांसमोरच घातला गोंधळ, आमदार आवताडेंनी फोन केला अन्..

पंढरपूर: परिवहन विभागाने (Transport Department) बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. शुक्रवारी (ता. 13) परिवहन विभागाच्या अधिकान्यांनी पंढरपूर शहरातील बेशिस्त रिक्षांवर कारवाईचा बडगा उगारताच भाजप कार्यकर्त्यांची दबंगगिरी समोर आली आहे.
कारवाई मागे घ्यावी, यासाठी काही भाजप (BJP) पदाधिकायांनी
अधिकाऱ्यांसमोर गोंधळ घालत राजकीय दबाव टाकल्पाची चर्चा सुरू आहे. पंढरपूर शहरात नियमबाह्यपणे रिक्षातून प्रवासी वाहतूक सुरू असल्याने परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. चालक परवाना जवळ न बाळगणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणे, रिक्षाची कागदपत्रे नसणे, मुदतबाह्य रिक्षातून प्रवासी वाहतूक करणे अशा विविध कारणांमुळे जवळपास 53 रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. कारवाईनंतर रिक्षा चालकांसह काही भाजप पदाधिकायांनी कारवाई मागे घेण्यासाठी अधिकान्यांसमोर गोंधळ घातला. यामध्ये काही स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते. दरम्यान, भाजप पदाधिकाऱ्यांच्या या राजकीय स्टंटबाजी बदल सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अलिकडेच, विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी जात असताना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंदिर समितीच्या अधिकारी व कर्मचान्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार ताजा असतानाच आता भाजप पदाधिकान्यांचा परिवहन विभागाच्या अधिकान्यांसमोरचा गोंधळ समोर आता आहे.
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिस, परिवहन विभाग, नगरपालिका आदी विभागाच्या वतीने शिस्त लावण्याचे काम सुरू आहे. मात्र, काही तथाकथित सामाजिक कार्यकर्ते आणि भाजप सारख्या शिस्तप्रिय पक्षाचे पदाधिकारीच चांगल्या कामांना खिळ घालण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. अशा दबंगगिरी करणाऱ्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे पक्षाच्या श्रेष्ठांनी कान टोचण्याची अपेक्षा ही या निमित्ताने व्यक्त केली जात आहे.
पंढरपूर शहरात नियमबाह्यपणे व बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर कारवाई करण्याचे काम सुरू आहे. शनिवारी एकाच दिवशी बेशिस्त 53 रिक्षांवर 7 लाख 39 हजार रूपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये दंडात्मक कारवाई मागे घेतले जाणार नाही. यापुढे कारवाईचे सातत्य ठेवण्यात येईल.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *