बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा सहावा दिवस करमाळ्यात प्रहार आक्रमक अहिल्यानगर टेंभुर्णी हायवे रोखला.

बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा सहावा दिवस करमाळ्यात प्रहार आक्रमक अहिल्यानगर टेंभुर्णी हायवे रोखला.

आज प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते मा,मंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या अनत्याग आंदोलनाचा सहावा दिवस असून त्यांची तब्येत खूपच बिघडली आहे आज सकाळी त्यांना रक्ताची उलटी सुद्धा झाली पाच किलो वजन कमी झाले आहे संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आक्रोश होत असून अनेक प्रकारे आंदोलन केली जात आहे सोलापूर जिल्ह्यात ही कालपासून वेगवेगळ्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहेत त्याच धर्तीवर आज करमाळ्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्या तालुका अध्यक्ष संदीप तळेकर यांचा माध्यमातून बच्चू भाऊंच्या समर्थनार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले करमाळा बायपास ला हे आंदोलन मोठ्या ताकतीने पार पडले यावेळी अनेक पक्ष संघटनेने पाठिंबा दिला यात बहुजन शेतकरी संघर्ष समिती,सकल मराठा समाज मनोज जरांगे पाटील गट,शिवसेना (उद्धव ठाकरे शिवसेना गट) रासप,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ,रयत क्रांती संघटना बळीराजा शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच वेगवेगळ्या गावातील ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी पाठिंबा दर्शवला.
यावेळी सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्याकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली सरकारचा निषेध करण्यात आला त्याचबरोबर अनेकांनी आपल्या भाषणातून आपला आक्रोश व्यक्त केला,जर 14 तारखेपर्यंत बच्चुभाऊंच्या आंदोलनाच्या मागण्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी शेतकरी हमी भाव, दुधाला 40 रू भाव मिळावा विधवा निराधार महिलांना 4000 रू मानधन,दिव्यांग बांधवांची 6000 रुपये मानधन वाढ यासह इतर पंधरा मागण्या तात्काळ मान्य केल्या नाही तर आम्ही काय संत नाही आज जरी आम्ही आंदोलन गांधीगिरीचे माध्यमातून करतं असेल तरी भगतसिंग आमच्या डोक्यामध्ये आहे या मार्गाने करण्याचा इशाराही प्रशासनाच्या माध्यमातून सरकारला देण्यात आला.
यावेळी प्रहार चे जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील करमाळा तालुकाध्यक्ष संदीप तळेकर,शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ अण्णा कांबळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष आशाताई टोणपे, शाहू दादा फरतडे शंभूराजे फरताडे , संजय शिंदे, प्रवीण कटारिया पंकज परदेशी, ,रयत क्रांतीचे राजकुमार सरडे शिवशंकर जगदाळे, प्रहार चे सरचिटणीस बापू तळेकर संभाजी ब्रिगेडचे अतुल निर्मळे आजिनाथ माने नितीन खटके , मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष सचिन काळे, स्वराज्य संघटना प्रवीण हांनपुडे मनोज दादा जरांगे पाटील समर्थक उदय भैय्या देशमुख, शेतकरी संघटना क्रांतिकारी अध्यक्ष, अमोल घुमरे, मुस्लिम समाज डॉ तुझ्या अब्दुल कलाम संघटना जमीर भाई सय्यद ,प्रहारच्या महिला तालुकाध्यक्ष स्वातीताई गोरे,युवा अध्यक्ष विकी मोरे तालुका उपाध्यक्ष सोमनाथ जाधव पप्पू ढवळे प्रहार चे संपर्कप्रमुख सागर पवार संघटक नामदेव पालवे, राहुल निमगिरे संतोष कुंभार बाळासाहेब काळे, जमीर भाई सय्यद बळीराजा शेतकरी संघटनेचे अण्णासाहेब रुपनवर अमित जागते भीम क्रांती ग्रुप शहाजी धेंडे, एपी ग्रुपचे अध्यक्ष अच्युत पाटील, सागर कुर्डे काका पारखे विजयसिंह ओहोळ योगेश ओहोळ सचिन तळेकर बालाजी अवताडे बंडू शिंदे धनराज भोगल तुषार ढवळे अशोक वीर पप्पू टापरे भाऊ मांढरे आजिनाथ कनेरे,यांच्यासह अनेक शेतकरी, विविध संघटना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.,

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *