शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तात्पुरती मलमपट्टी न करता रामबाण उपाययोजना करा .. .

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तात्पुरती मलमपट्टी न करता रामबाण उपाययोजना करा .. .

सामाजिक कार्यकर्ते.पै.माऊली हेगडे यांची राज्यपाल व मुख्यमंत्रीकडे मागणी …

सोलापूर : शेतकऱ्याला निसर्गाच्या लहरीपणापासून वाचविण्यासाठी किंबहुना अशा संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी शेती क्षेत्राकरिता रामबाण उपाय योजना करण्याची गरज आहे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते.पैलवान माऊली हेगडे यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे
राज्यामध्ये पावसाळा सुरु होण्यापूर्वीच पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.मे महिन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यामध्ये चक्रीवादळ आणि अवकाळी स्वरुपामध्ये सर्वदूर पाऊस पडला आहे.
काही दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री म्हणाले होते की त्यांना देण्यात आलेले “कृषिमंत्री” पद हे “ओसाड गावाची पाटीलकी आहे.” राज्याच्या कृषी विभागाच्या मंत्री महोदयांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन असा निराशाजनक आहे. दुष्काळ पडला,अवकाळी पाऊस पडला,अतिवृष्टी झाली,पूर परिस्थिती निर्माण झाली की नुकसान भरपाई देण्यात येते. नुकसान भरपाई ही केवळ तात्पुरती मलमपट्टी असते. नुकसान भरपाई च्या मानाने झालेले नुकसान हे खूपच मोठे असते. येत्या काळामध्ये “वैश्विक हवामान बदल संकटा” मुळे शेती क्षेत्राला मोठ्या बदलास तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अशा बदलास तोंड देण्यासाठी आर्थिक दृष्टीने आणि मानसिक दृष्टीने सक्षम करणे आवश्यक आहे. शेतीसाठी पाणी, बी-बियाणे, खते, वीज इत्यादी महत्त्वाची “आदाने” आहेत. शेतीमध्ये एखाद्या हंगामामध्ये नुकसान झाले तर त्याचा परिणाम पुढील हंगामावर देखील दिसून येतो. महाराष्ट्र राज्यामधील बहुसंख्य शेतकरी हा आज देखील हंगामी पिके घेतो. त्यामुळे, एखाद्या हंगामामध्ये नुकसान झाले किंवा हंगाम वाया गेला, तर शेतकरीच नाही तर त्याचे संपूर्ण कुटुंबे मोठ्या दडपणाखाली येते.
बागायती शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या संपन्न आहे.परंतु,हंगामी पिके घेणारा कमी क्षेत्र असणारा आणि पाण्याची कमी किंवा त्रोटक सोय असणारा शेतकरी हा सर्व प्रकारच्या विवंचनेमध्ये अडकलेला दिसून येतो. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीवर केवळ पंचनामा करून नुकसान भरपाई देणे,हा तात्पुरता उपाय न करता शेतकऱ्यास स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी करण्यासाठी “पीएम-किसान” योजने मधून देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीसह बी-बियाणे चांगल्या दर्जाची व विनामूल्य देण्यात यावीत,खते आणि पाणी हे देखील विनामूल्य देण्यात यावे.तसेच वीज देखील नाममत्र शुल्कासह उपलब्ध करून देण्यात यावी.याबाबत सहानुभूतीने आणि व्यापक हिताच्या दृष्टीने निर्णय घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांसाठी आज रोजी देखील विविध योजना आहेत, त्यामध्ये असलेल्या त्रुटी दूर करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केवळ तात्पुरती उपाययोजना न करता कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात.शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत ,असे सामाजिक कार्यकर्ते.पैलवान माऊली हेगडे यांनी निवेदनात हेगडे यांनी म्हटले आहे.
—-

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *