रोशन शिक्षण संकुलात गणेश उत्सव मोठया उत्साहात साजरा




रोशन शिक्षण संकुल येथे गणेश उत्सवाचा आठवा दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. “रोशन श्री प्रतिष्ठाण” तर्फे आज शनिवार दि.१४/९/२०२४ची महापूजा मा.श्री चेतनभाऊ नरोटे साहेब (अध्यक्ष, सोलापूर शहर काॅंग्रेस कमिटी) श्री तिरुपती परकीपंडला (अध्यक्ष, सोशल मिडिया सेल, कॉंग्रेस कमिटी सोलापूर) व श्री शंकरभैय्या नरोटे (युवा उद्योजक) यांच्या शुभहस्ते श्रींची पूजा करण्यात आली. आजच्या पूजेचे आयोजन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आले. रोशन श्री प्रतिष्ठानच्या वतीने प्रशालेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते प्रमुख अतिथींचा शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री चेतनभाऊ नरोटे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या गणेशोत्सवापासून आजपर्यंतच्या गणेश उत्सवाचा लेखाजोखा त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा व सामाजिक विकास होण्यासाठी गणेश उत्सवाचा सिंहाचा वाटा कसा आहे हे विद्यार्थ्यांना विविध उदाहरणातून पटवून दिले. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी लेझीम या मराठमोळ्या खेळाचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे भरभरून कौतुक केले तसेच रोशन श्री प्रतिष्ठानच्यावतीने घेतल्या जाणार्या विविध स्पर्धां व उपक्रमाबद्दल मुख्याध्यापक व शिक्षकांचे देखील कौतुक केले. पूजेसाठी संकुलातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
Leave a Reply