शहर उत्तरच्या निवडणूक मैदानात वकिल साहेबांची इन्ट्री….

शहर उत्तरच्या निवडणूक मैदानात वकिल साहेबांची इन्ट्री….

विधानसभा निवडणूका एका महिन्यांवर आले असून,सोलापुरात मात्र विद्यमान आमदारांची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत चालली असून आता महाराष्ट्र – गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद थोबडे यांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या उज्वल भविष्यासाठी येणारी विधानसभा कोणत्याही परिस्थितीत लढवणार असल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले.सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात नेतृत्व बदल करण्याची गरज असल्याचे सांगत,विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात उघड आव्हान दिले असून,मतदारसंघात निधी खेचून आणण्यासाठी येथील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सक्षम नेतृत्वाची आवश्यकता असून येथील आमदारांच्या निष्क्रियतेमुळे सोलापूरला मिळणारा टेक्सटाइल पार्क अमरावती ला गेला,पाण्याची समस्या आज ही जैसे थे अशी असून आता माझ्यासारख्या उच्चभुशित माणसाने राजकारणात येऊन शहराच्या विकासासाठी योगदान देण्याची गरज असून भारतीय जनता पार्टीकडे मी उमेदवाराची मागणी केली.
मागील वेळी मला आपण यावेळी थांबा पुढील वेळी आपला नक्की विचार करू असे भाजप मधील वरिष्ठ मंडळींनी मला शब्द दिला होता असल्याचे मिलिंद थोबडे यांनी सांगितले.
कोण आहेत मिलिंद थोबडे ?
मिलिंद थोबडे हे सिध्देश्वर यात्रेचे मानकरी असून,सिद्धेश्वर यात्रा यांच्या घरातून सुरू होते, थोबडे सिद्धेश्वर देवस्थान विश्वस्त असून लिंगायत समाजातील हे मोठे घराणे आहे समाजात यांना मानणारा मोठा वर्ग असून महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशन चे 2 वेळा अध्यक्ष होण्याचा बहुमान यांच्या रूपाने सोलापूरला मिळाला होता. मिलिंद थोबडे यांनी घेतलेल्या निर्णयाने शहर उत्तर मतदारसंघातील राजकीय समीकरणे बिघडणार असून हरियाणा पॅटर्न जर राज्यात राबविण्याचा भाजपचा विचार असेल तर थोबडे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा आहे.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *