Kedarnath Helicopter crash : केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, महाराष्ट्रातील एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू
उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये रविवारी भाविकांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेमध्ये पायलटसह ७ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महाराष्ट्रातील एकाच कुटुंबातील ३ जणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. हे तिघेही केदारनाथला दर्शनासाठी गेले होते. पहाटेच्या सुमारास देवदर्शनासाठी जात असताना त्यांचे हेलिकॉप्टर कोसळलं. या हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्यासोबत आणखी काही भाविक होते. त्यांचा देखील या अपघातामध्ये मृत्यू झाला.
Leave a Reply