उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सपत्नीक वर्षा निवासस्थानी घेतले गणरायाचे दर्शन
उपराष्ट्रपती जगदीप धनखड, त्यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथील श्री गणेशाचे दर्शन घेतले. याप्रसंगी उपराष्ट्रपती जगदीप धनखड व त्यांच्या पत्नी डॉ. सुदेश यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनखड दाम्पत्याचे स्वागत केले तसेच त्यांचा श्री गणेशाची मूर्ती देऊन सत्कार केला. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, त्यांच्या पत्नी वृषाली शिंदे उपस्थित होते.
Leave a Reply