सूर्योदय हनुमान देवस्थान तरुण मंडळ , दत्त नगर येथील भव्य लिंग भैरवी देखावा उद्घाटन समारंभ ग्रामीण पोलीस उप अधिक्षक विजयालक्ष्मी कुर्री यांच्या हस्ते संपन्न.
शिव आणि शक्ती यांच्या शक्तीचे प्रतिक असणारे तामिळनाडू मधील कोइंबतूर येथील ईशा फाउंडेशन चे लिंग भैरवी हा ओपन देखावा यावर्षी सादर करण्यात आलेला आहे. सदर देखाव्याचे उद्घाटन नारी शक्ती चा आदर्श असणारे विजयालक्ष्मी कुर्री – ग्रामीण पोलीस उपअधीक्षक, रामेश्वरी बिर्रू – नगरसेविका , डॉ गाजुल, गिरिजा बल्ला – शिक्षिका, अन्नपूर्णा जिल्हा – सामाजिक कार्यकर्त्या आणि मोनिका ध्यावनपल्ली – प्रसिध्द नाट्य विशारद यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी दत्त नगर येथील रहिवासी उपस्थित होते.
सदर देखावा पाहण्यासाठी नागरिकांची रांग लागलेली आहे. मंडळाचे अध्यक्ष सागर श्रीगादी यांनी सांगितले. सदर देखावा हृषिकेश, चेतन, श्रीकांत, श्रीनिवास, निखिल, अथर्व,प्रथमेश,रत्नाकर,सागर पूल्ली,महादेव यांनी अथक परिश्रम घेतले.
Leave a Reply