पाणी आलं आलं..म्हणत गेलं गेलं…, आमदार समाधान आवताडे पाण्यासाठी का झाले आक्रमक

पाणी आलं आलं..म्हणत गेलं गेलं…, आमदार समाधान आवताडे पाण्यासाठी का झाले आक्रमक

सोलापूर : पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे हे म्हैसाळ योजनेच्या पाण्यावरून सभागृहात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

म्हैसाळ योजनेतून मंगळवेढ्याच्या 19 गावांना पाणी दिले जाते. आजपर्यंत केवळ तीस दशलक्ष पाणी दिले गेले. या योजनेतून आमचा नेमका वाटा किती? पाणी आलं आलं..म्हणत गेलं गेलं…,अशी आमची अवस्था झाली आहे.
संबंधित कार्यकारी अभियंता पवार यांनी उत्तर दिले की, या उपसा सिंचन योजनेवर कवठे महांकाळ, जत, सांगोला आणि मंगळवेढा हे तालुके आहेत. मंगळवेढ्याला चार आवर्तनात 1.25 TMC पाणी प्रस्तावित आहे अशी माहिती दिली.

चार आवर्तन झाली पण आजपर्यंत केवळ 0.25 TMC पाणी दिले आहे. आम्ही टेक भागात असून प्रेशरने पाणी येत नाही, अडवले जाते, आमच्या हक्काचे पाणी कधी मिळणार. पालकमंत्र्यांनी सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांला सुनावले, अडचणी असतील तर शासनासमोर मांडा.
दरम्यान याच चर्चेत खासदार प्रणिती शिंदे यांनी सहभाग घेत निधी लागणार असेल तर मागणी करा अशी सूचना केली.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *