विराट कोहली आणि रोहित शर्माची जर्सी रिटायर होणार का? यापूर्वी 10 आणि 7 नंबरचं झालं तसंच…
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आपल्या कामगिरीने क्रिकेटविश्वात नावलौकिक मिळवला आहे. पण आता दोघंही टी20 आणि कसोटी क्रिकेटमध्ये दिसणार नाहीत. कारण या दोघांनी या दोन्ही फॉरमेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे या दोन्ही फॉर्मेटमध्ये 45 आणि 18 क्रमांची जर्सी दिसणार नाही. (फोटो- पीटीआय)
रोहित शर्मा 45 क्रमांकाची जर्सी आणि विराट कोहली 18 क्रमांकाची जर्सी घालतो. आता प्रश्न असा आहे की या दोन्ही खेळाडूंच्या जर्सी देखील निवृत्त होतील का? यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यासोबत असं घडलं आहे. (फोटो- पीटीआय)
टी20 आणि कसोटी क्रिकेटमध्ये 45 आणि 18 क्रमांकाची जर्सी देखील निवृत्त होईल का? तर याचे उत्तर सध्या नाही असे असू शकते. कारण विराट आणि रोहित शर्मा अजूनही एकदिवसीय क्रिकेट खेळत आहेत. (फोटो- पीटीआय)
वनडे फॉरमॅटमध्ये दोन्ही खेळाडू त्याच क्रमांकाची जर्सी घालतात. अशा परिस्थितीत या क्रमांकाची जर्सी आत्ताच निवृत्त करता येणार नाही. पण टी20 आणि कसोटीबाबत काय निर्णय घ्यायचा हे फक्त बीसीसीआयच ठरवू शकते. (फोटो- पीटीआय)
बीसीसीआयने सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या जर्सी निवृत्त केल्या आहेत. सचिन तेंडुलकरची जर्सी क्रमांक 10 ही 2017 मध्ये निवृत्त झाली होती. 2020 मध्ये महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर बीसीसीआयने 7 क्रमांकाची जर्सी देखील निवृत्त केली.
Leave a Reply