पतीस ‘ …तुम्ही घरी चला’ असं सांगून देवदर्शनासाठी गेलेली डॉक्टर बेपत्ता
पतीस ‘ …तुम्ही घरी चला’ असं सांगून देवदर्शनासाठी गेलेली ३५ वर्षीय डॉक्टर महिला मंदिर परिसरातून बेपत्ता झालीय. ही घटना शनिवारी, १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी सिद्धेश्वर मंदिरात घडलीय. डॉ. प्रज्ञा प्रांजल कुलकर्णी असं बेपत्ता डॉक्टर महिलेचं नांव असल्याचं पोलीस आयुक्तालय माहिती कक्षातून सांगण्यात आलंय.
विजापूर रस्त्यावरील द्वारका नगरीतील रहिवासी डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी शनिवारी ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यांची, पती प्रांजल कुलकर्णी यांच्याशी मंदिर परिसरात भेट झाली. या भेटीत मी देवदर्शन करून घरी येते, तुम्ही घरी चला’ असं सांगून देवदर्शनासाठी मंदिरात गेल्या. मात्र त्या २४ तास उलटले तरी घरी आल्या नाहीत.
त्यांचा आजुबाजुलाच्या राहते परिसरात, एस. टी. स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, इतर नातेवाईकांकडे शोध घेतली असता, त्या मिळून आल्या नाहीत.
त्यामुळे पती प्रांजल प्रफुल्ल कुलकर्णी यांनी डॉक्टर प्रज्ञा बेपत्ता झाल्या असल्याची तक्रार फौजदार चवळी पोलीस ठाण्यात दाखल केली. रंग : गोरा, उंची : ५ फुट, बांधा : मध्यम, चेहरा : गोल, केस : वेणी घालते, निळी पॅन्ट राखाडी कलरचा शर्ट असा पोषाख असून त्यांना मराठी, हिंन्दी, इंग्रजी बोलता येतात, असं यांचं वर्णन असून यासंबंधी अधिक माहिती असणाऱ्यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचा आवाहन करण्यात आलंय.
*
Leave a Reply