जूना विडी घरकुल येथे आढळला विषारी घोणस जातीचा साप …..
रात्री ची वेळ 8 pm वाजल्यापासून लाईट गेलेली रिमझिम पाऊस पडत होते तांबे मावशी मोबाइल टॉर्च च्या उजेडात विड्या बनवत होते अचानक फुस्स फुस्स आवाज येतो तांबे मावशी यांनी मोबाइल हातात घेऊन पाहणी केली असता एक साप घरात शिरत असल्याचे दिसले घाबरलेल्या तांबे मावशीनी आपला मुलगा अविनाशला आवाज दिला आपल्या घरात साप आला आहे. अविनाश तांबे यांनी सर्प मित्र शकील जमादार यांना फोन केले. सर्पमित्र शकील जमादार यांनी लक्ष्मी चौक येथे राहत असलेले अविनाश तांबे यांच्या घरी पोहचून पाहणी केली असता एक विषारी घोणस जाती साप निदर्शनास आले. सापास हात न लावता शान्त पणे प्लास्टिक च्या भरणीत बंद केले. हा साप साधारण दोन ते अडीच फूट लांब होते.बदलत्या वातावरणा मूळे साप बाहेर पडत असल्याचे सर्प मित्र शकील जमादार यांनी सांगीतले. आपल्या भक्ष्या शोधात बिळातून साप बाहेर पडतात आपल्या घराच्या आजू बाजू चा परिसर स्वच्छ ठेवा असे आवाहन सर्प मित्र शकील जमादार यांनी सोलापूरकरांना केले आहे.
Leave a Reply