द मतदार संघाचे प्रहार चे उमेदवार बाबा मिस्त्री यांचा 16 गावचा गावभेट दौरा संपन्न.
दक्षिण सोलापूर मतदार संघाचे प्रहार जनहित व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार मौलाली बाशुमियाॅ सय्यद बाबा मिस्त्री यांचा दक्षिण सोलापूर मतदार संघातील सलगरवस्ती डोणगाव,तेलगाव सीना,अकोल मंद्रुप गुंजेगाव, कंदलगाव अंत्रोळी,वडापुर कवठे बेलाटी,शिवणी,पाकणी तिर्हे शेवटी हिरज या गावचा गावभेट दौरा संपन्न झाला.
वरील गावाच्या गावभेट दौऱ्यावेळीस बाबा मिस्त्रींचा आगमन होताच गावातील महिला मंडळींकडून आरती करून ओवाळणी करण्यात आली.
बाबा मिस्त्रींना आजच्या दक्षिण सोलापूर मतदार संघातील गावातुन वाढलेल्या प्रतिसादामुळे त्यांच्या विरोधात उभे असलेल्या सर्वच उमेदवारांची डोकेदुखी वाढत असल्याचे पहावयास मिळत आहे.
वाढत्या प्रतिसादामुळे नेमकं बाबा मिस्त्री काय म्हणाले ते पहा.
Leave a Reply