लिंगायत समाजातून चार ते पाच उमेदवात उभे करण्यात भाजपला यश आले आहे……………
लिंगायत समाजातून चार ते पाच उमेदवात उभे करण्यात भाजपला यश आले आहे. मात्र या मत विभाजनाचा फायदा मलाच होईल असा विश्वास अपक्ष उमेदवात युवराज राठोड यांनी व्यक्त केला.
मतदान पूर्व तयारीसाठी आयोजित पत्रकारांशी बैठकीत राठोड बोलत होते. सत्ताधाऱ्यांच्या पायाखालील वाळू घसरली आहे.त्यामुळे त्यांनी लिंगायत समाजात फूट पाडण्यांचा प्रयत्न केला. अपक्ष आमदार लिंगायत समाजातून उभे केले. त्याचा फायदा त्यांना नव्हे तर मला होईल. कारण हा समाज जागरूक झाला आहे, असे ते म्हणाले.
समाजात फूट पाडणे ही भाजपची जुनी पद्धत आहे. तीच दक्षिण सोलापुरात वापरत आहेत. त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले.
सोलापुरात पंतप्रधान आले. त्यांनी जाती जातीत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण सोलापुरातील जनता सुज्ञ् आहे. एक है तो सेफ है हे आम्हाला माहीत आहे. म्हणूनच जनता माझयामागे उभी राहील असे ते म्हणाले.
Leave a Reply