परभणी -दगडफेक प्रकरणी ताब्यात घेतलेल्या तरुणाचा मृत्यू
परभणीत ११ डिसेंबरला झालेल्या दगडफेक, जाळपोळ प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. १० डिसेंबर रोजी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली होती.यानंतर ११ डिसेंबरला परभणी बंदची हाक दिली होती. परभणी बंद वेळी शहरात दगडफेकीसह जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. यानंतर परभणी पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं. यापैकी सोमनाथ सुर्यवंशी याचा आज सकाळी मृत्यू झाला आहे. छातीत कळ येत असल्यानं त्याला रुग्णालयात दाखल केलं. पण तिथं त्याचा मृत्यू झाल्याचं डॉ़क्टरांनी सांगितलं. त्याचं शवविच्छेदन छत्रपती संभाजीनगरमध्ये करण्यात येणार आहे.
नांदेड परिक्षेत्राचे महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी माहिती देताना सांगितलं की, सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. सकाळी छातीत कळ येत असल्याचं त्याने तुरुंग अधिकाऱ्यांना सांगितलं होतं. त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं पण तिथं त्याचा मृत्यू झाला.
Leave a Reply