सोलापूर एपीएमसी निवडणुकीत अब आयेगा मजा….नवा ट्वीस्ट

भाजपाच्या कमळाला काँग्रेसच्या हाताची साथ, कार्यकर्त्यांसाठी “दोन देशमुख साथ साथ है।” प्रस्थापित नेत्यांविरुध्द कार्यकर्त्यांची लढाई, तिकडे सगळेच नेते अस्तित्वासाठी जीवाचे रान करणार तर इकडे कार्यकर्त्यांच्या मागे नेत्यांची ताकद। देवाभाऊचा निरोपच नाही कुणाला, मग खरं काय? पब्लीक सब जानती है भाई, गोलमाल है गोलमाल…। लक्ष्यवेध न्यूज पोर्टलचा परफेक्ट नॅरेटिव्ह…

सोलापूर एपीएमसी निवडणुकीत अब आयेगा मजा....नवा ट्वीस्ट

सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत नवा ट्वीस्ट झाला असून भाजपाच्या कमळाला काँग्रेसच्या हाताची साथ ही अंदरकी बात है। तर कार्यकर्त्यांसाठी दोन देशमुख साथ साथ है, चा नारा दिला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मागे नेत्यांची मोठी ताकद मिळाली आहे. प्रस्थापितांविरुध्द कार्यकर्त्यांची लढाई असे चित्र असून त्यामुळे सत्ताधारी पॅनलच्या नेत्यांना आपल्या अस्तित्वासाठी जीवाचे रान करावे लागणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निरोपच कुणाला आला नाही, अशी माहिती समोर आल्यामुळे नेमकं खरं काय, असा सवाल उपस्थित होत आहे, यह सब गोलमाल है भाई गोलमाल, असा सूर आता ऐकायला  येत आहे.
बाजार समितीसाठी 16  एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. लक्ष्यवेधच्या न्यूज पोर्टलने “चार आमदार असूनही भाजपाला मिळणार फक्त दक्षिणा” असा मुद्दा उपस्थित केला होता. काँग्रेसकडे स्वाभिमान गहाण टाकून लाचारी पत्करणार का? त्यामुळे कार्यक़र्ते अस्वस्थ आहेत, याकडे लक्ष वेधले होते. त्याचा परिणाम म्हणजे आ.सुभाष देशमुख यांनी कार्यकर्त्यांसाठी निवडणूक़ लढणार या त्यांच्या भूमिकेस आ. विजयकुमार देशमुख यांनी होकार देत हम साथ साथ है म्हणत दोघे समोर आले. तर तिकडे काँग्रेसच्या बाजूने पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. सचिन कल्याणशेट्टी आणि आ.देवेंद्र कोठे  गेले, ही फाटाफूट समोर आली. परंतु भाजपाच्या पॅनलला काँग्रेसचीही साथ मिळणार असल्याचे स्पष्ट असून त्यासाठी थोडी प्रतीक्षा आहे.  आता या निवडणुकीत माजी पालकमंत्री गोरे, आ.कल्याणशेट्टी, आ. कोठे आणि माजी आ.दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली सिध्देश्‍वर विकास पॅनलमध्ये शिंदे समर्थक सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे, श्रीशैल नरोळे, उबाठाचे गणेश वानकर, इंदुमती अलगोंडा, अविनाश मार्तंडे, नागण्णा बनसोडे ही तगडी नेतेमंडळी देखील आहेत. तर आ.सुभाष देशमुख यांच्या सिध्देश्‍वर परिवर्तन पॅनलमध्ये विद्यमान संचालक रामप्पा चिवडशेट्टी, अप्पासाहेब पाटील, मनीष देशमुख, डॉ.हविनाळे वगळता अन्य सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत. त्यांच्यासाठी भाजपाचे आ.सुभाषबापू आणि आ.विजय देशमुख हे आपली ताकद पणाला लावणार आहेत.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *