दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी येथील सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सांगता..
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी येथे श्री नरसिंह जयंती ते संत चोखामेळा यांच्या समाधी सोहळ्या निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले होते हे सप्ताहाचे 9वर्ष आहे.
या सप्तहाची सुरुवात 11मे 2025पासुन सुरूवात झाली होती.
यावेळेस कलश पुजन ध्वज पुजन मृदंग पुजन वीणा पुजन ग्रंथ पुजनाने उपस्थित महाराजांच्या हस्ते या सप्तहाचे उद्घाटन करण्यात आले होते
दररोज काकडा आरती ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन संगीत भजन प्रवचन सायंकाळी 8वाजता हरि किर्तन त्या नंतर हरि जागर असे दैनंदिन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या सप्तहास सात दिवस निरंतर नामवंत किर्तनकारांचे किर्तन रुपी सेवा संपन्न झाली त्याचबरोबर अनेक महाराजांचे प्रवचन संपन्न झाली.
आज शनिवार दिनांक 17मे2025रोजी हभप सुधाकर इंगळे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता झाली.
आज सकाळी संपूर्ण गावातून मोठ्या भक्तिभावाने ग्रंथ गाथेची ज्ञानोबा तुकारामांचा जयघोषात भजनी मंडळाच्या माध्यमातून दिंडी काढण्यात आली.
सलग सात निरंतर सकाळ आणि संध्याकाळची महाप्रसाद तसेच नाश्ता चहाचे ही आयोजन गावातील अन्नदात्यांनी केलं होतं
आज काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे ही आयोजन करण्यात आली आहे
या सप्तहास वीणेकरी मृंदगाचार्य गायनाचार्य ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ व्यवस्थापक काकडा प्रमुख हार्मोनियम वादक पुष्पहार सेवा फळ सेवा हरि जागर सेवा व्यवस्थापक, चोपदार मंडप स्प्पिकर पिण्याच्या पाण्याची सोय भोजन व्यवस्था हरि जागर सेवा महावितरण कंपनीने अधिकारी मंद्रूप पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी वर्ग तसेच पाथरी गुंजेगाव तेलगाव सीना अंत्रोळी येळेगाव मंद्रूप कवठे डोणगाव गावडेवाडी नंदुर अकोले मंद्रूप यांच्यासह पांडुरंग भजनी मंडळ यांचें विशेष सहकार्य लाभले.
Leave a Reply