बटरफ्लाय इंग्लिश मीडियम स्कूल चा एस. एस. सी. चा निकाल १०० %
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एस. एस. सी बोर्ड परीक्षेत श्री सिद्धेश्वर शिक्षण मंडळ संचालित बटरफ्लाय इंग्लिश मीडियम स्कूलचा इयत्ता दहावी एस. एस. सी. बोर्ड परीक्षेचा निकाल १०० % लागला.
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात प्रशालेतील एकूण ४१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. कु. आकांक्षा श्रीकांत अमृतकर ही विद्यार्थिनी ९३.६०% गुणांसह प्रशालेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तर कु. देवयानी सुनील गायकवाड व नुपुर बसवराज तुगावकर या विद्यार्थीनी ९३.४०% गुणांसह द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. चि.अभिनव मल्लिनाथ हन्नूरे हा विद्यार्थी ९०.८०% गुण पटकावून प्रशालेत तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. एकूण २५ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह , १२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत.
संस्थेचे अध्यक्ष अॅड. एस. आर. पाटील , उपाध्यक्ष श्री एस. एस. नागावकर , श्री व्ही. जे. देवणीकर, खजिनदार अॅड. शंकर पाटील, सचिव डॉ. एस. ए. हलकुडे , सहसचिव श्री ए. ए. सिंदगी यांच्यासह शालेय समिती व संस्थेचे सर्व विश्वस्त तसेच माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका डॉ रश्मी कुंभार, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. रश्मी पुर्वत, समन्वयिका सौ. विजया बिराजदार यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षिकांचे अभिनंदन केले.
प्रति,
मा. संपादक
दैनिक ———————————
सोलापूर.
( वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्ध करून प्रशालेस सहकार्य करावे ही विनंती )
Leave a Reply