कुचन प्रशालेत प्रवेशोत्सव साजरा.
पद्मशाली शिक्षण संस्था संचलित, कुचन प्रशालेत आज नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे औक्षण करून , विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते इयत्ता पाचवी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटण्यात आली. यावेळी नवप्रवेशित विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. पल्लवी ननवरे यांनी सरस्वती वंदना घेतली. यानंतर विद्यार्थ्यांना गोड खाऊ वाटप करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त तथा शालेय समिती अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली हे होते. याप्रसंगी प्राचार्य युवराज मेटे, उपप्राचार्य अनिल निंबाळकर, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगु, प्रणिता सामल, मल्लिकार्जुन जोकारे तसेच सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका सविता चिप्पा यांनी केले.
Leave a Reply