सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार हाटगा रोडवरील विमानतळावरून दिल्लासाठी विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली

सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार हाटगा रोडवरील विमानतळावरून दिल्लासाठी विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली

सोलापूर : सोलापुरातून गोव्यासाठी प्रवासी विमानसेवा सुरू झाल्यानंतर येत्या नोव्हेंबरअखेर होटगी रोडवरील विमानतळावरून दिल्लीसाठी विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, स्टार एअर लायन्स कंपनी मुंबई, पुणेसाठी ऑगस्टमध्ये विमान सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे, तर त्याआधी तिरुपतीला विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली.
सोलापूर ते गोवा या प्रवासी विमानसेवेची सुरुवात नऊ जूनपासून झाली आहे. या विमानसेवेस सोलापूरकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दररोज सरासरी 70 ते 80 प्रवासी प्रवास करत आहेत. त्यामुळे कोकण परिसर, गोव्यातून जिल्ह्यातील धार्मिक पर्यटनस्थळी येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अशा भाविकांची गोवा-सोलूपर विमानसेवेमुळे सोय झाली आहे. येत्या 15 ऑगस्टपर्यंत सोलापूरातून मुंबई व पुणे या दोन शहरांसाठी प्रवासी विमानसेवा सुरु होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी सोलापूर ते तिरुपती ही सेवाही सुरु होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली.
सोलापुरातून मुंबई व पुणे या दोन्ही ठिकाणची प्रवासी विमानसेवा सुरु झाल्यानंतर सोलापुरातून दिल्ली, बंगळुरु, भाग्यनगर या सारख्या शहरासाठीही प्रवासी विमान सेवा सुरु होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम
सोलापूर ते गोवा प्रवासी विमानसेवा उद्घाटनास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार होते; मात्र प्रतिकूल हवामानामुळे विमान उतरू न शकल्याने मुख्यमंत्री या दिवशी सोलापुरात आले नाहीत. मुंबई व पुणे येथील प्रवासी विमानसेवेच्या उद्घाटनासाठी मात्र मुख्यंमत्री सोलापुरात येतील, असा विश्वास केंद्रीय विमान सेवा राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री यांच्या हस्तेच 15 ऑगस्ट दरम्यान सोलापूर-मुंबई ही प्रवासी विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *