जागृती विद्यामंदिर माध्यमिक उच्च माध्यमिक प्रशाला नेहरूनगर सोलापूर येथे श्री गणेश विसर्जन मिरवणूक थाटामाटात संपन्न झाला….

जागृती विद्यामंदिर माध्यमिक उच्च माध्यमिक प्रशाला नेहरूनगर सोलापूर येथे श्री गणेश विसर्जन मिरवणूक थाटामाटात संपन्न झाला…

 

 

याप्रसंगी प्रशालेतील श्री गणरायाची सर्वप्रथम प्राचार्य विजयरत्न चव्हाण व पर्यवेक्षक श्री म्हमाणे एम एल यांच्या शुभहस्ते आरती करण्यात आली त्यानंतर गणेश मूर्ती सजवलेल्या रथामध्ये बसवून भव्य मिरवणूक काढण्यात आली याप्रसंगी इयत्ता आठवी ते बारावी वर्गातील दोनशे विद्यार्थ्यांनी बहारदार लेझीम सादर केले स्टार ढोलीबाजा पथकाने सुरेख अशा संगीताच्या तालावर सुंदर लेझीम प्रकार सादर करण्यात आले लेझीम संघाची तयारी सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती नलिनी राठोड मॅडम व क्रीडा शिक्षक श्री संतोष जाधव सरांनी कमी वेळात तयारी करून घेतली सकाळी नऊ वाजता निघालेली मिरवणूक दुपारी ठीक सव्वा बारा वाजता कंबर तलाव येथे पोहोचली त्या ठिकाणी गणरायाला सर्व विद्यार्थी व प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी निरोप दिला याप्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *