काँग्रेसच्या गुंडांकडून नवनीत रानांवर हल्ला करण्याचा प्रयत्न……..
अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील खल्लार येथे महायुवतीच्या स्टार प्रचारक माजी खासदार नवनीत राणा यांची काल रात्रीला सभा आयोजित करण्यात आली होती. युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदिले यांच्या प्रचारासाठी नवनीत राणा ह्या दर्यापूर विधानसभेत विविध ठिकाणी प्रचार सभा घेत आहेत. त्यांच्या प्रचार सभांना जनतेकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता काँग्रेस आणि महाभकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे महाभकास आघाडीने विशिष्ट धर्मातील गुंडांना हाताशी धरून त्यांना नवनीत राणांवर हल्ला करण्यासाठी पाठवले. नवनीत राणांची सभा उधळण्याचा प्रयत्न करण्यात आला. खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली.
नवनीत राणा यांची सभा उधळण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेनंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. खल्लार पोलीस ठाण्यावर धडक देत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. काँग्रेसच्या समाजकंटकांना तातडीने अटक करावी तोपर्यंत आम्ही ठाण्यातून हटणार नाही अशी भूमिका देखील घेण्यात आली आहे.
Leave a Reply