अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याच्या सूचना दिल्या आहेत – अजित पवार

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याच्या सूचना दिल्या आहेत – अजित पवार

ON कारखाना मतदान
– ज्यांच्यामध्ये कारखाना व्यवस्थित चालवायची धमक आहे त्यांनाच मतदान करावं

ON वळवाचा पाऊस
– हवामान खात्याने पुढील काळात पावसाचा अंदाज वर्तवला होता. 12 ते 13 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट सांगितला होता. तसं वातावरण आपल्याकडे झालेल आहे. कोणाची तीव्रता जास्त होती ती कमी झाली आहे. उन्हाळी पिकांचं नुकसान झालं आहे पण उसाला फायदा झाला. केळीच्या बागा वगैरे याचं नुकसान झालं. पुण्याच्या विभागीय आयुक्तांना कालच जिल्हाधिकाऱ्यांना सूचना द्यायला सांगितल्या. नुकसान भरपाई देण्यासाठी सूचना केली आहे.

ON निवडणूक प्रचार सभा
– माझा झंजावाती दौरा नव्हता, शेवटचे दोन दिवस मी प्रचार सभा घेतल्या. मी सभासद आहे माझे वडील, माझे आजोबा सभासद होते. आमच्या परिवाराचे अनेक जण सभासद आहेत. राजकीय दृष्ट्या नाही तर आमच्या आर्थिक दृष्ट्या आमच्या 53 गावातल्या इंदापूर आणि बारामती तालुक्यातील दृष्टीने हा साखर कारखाना फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे थोडसं यावर्षी लक्ष घातलं.

ON एकतर्फी निवडणूक
– एकतर्फी निवडणूक नव्हती कुठलीही निवडणूक म्हटलं की, आम्ही ती तुल्यबळ आहे अशी समजूनच निवडणुकीत लक्ष घालतो.

ON संजय राऊत नरकातील स्वर्ग पुस्तक
– मी त्याच्याबद्दल काहीही बोलणार नाही
– मी पुस्तक वाचलेलं नाही
– मला नरकाचे माहित नाही स्वर्गाचे असेल तर मी सांगेन

 

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *