दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना संविधान भेट – जे बी ग्रुपतर्फे प्रेरणादायी उपक्रम
सोलापूर : शास्त्रीनगर परिसरातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार जे बी ग्रुप तर्फे हार व शाल घालून करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची प्रत देण्यात आली. संविधानाच्या मुल्यांवर चालत पुढील आयुष्यात चांगले नागरिक बनावे, असा संदेश यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आला.
या कार्यक्रमात जे बी ग्रुपचे संस्थापक वाहीद बिजापुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,”तुम्ही भविष्यात कोणतेही क्षेत्र निवडा, पण संविधानाच्या मार्गावरून कधीही भरकटू नका. भारतीय संविधान हे आपले सर्वोच्च मार्गदर्शक आहे.”
या उपक्रमाचे उपस्थित पालकांनी आणि स्थानिक नागरिकांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्येही या सत्कारामुळे नवीन प्रेरणा आणि देशभक्तीची भावना निर्माण झाली.
सत्कारित विद्यार्थी
सानिया मोहम्मद अली शेख – 92%
फरीजा रियाज अहमद बीजापुरे – 88%
दानिश मोहम्मद गौस बेलिफ – 88%
दानिश ईलियास शेख – 81%
अब्दुल रहमान महबूब – 80%
सानिया बीजापुरे – 73%
Leave a Reply