सागर सिमेंट व एम के फाउंडेशन च्या वतीने एक लाख वही वाटप शुभारंभ करण्यात आला.

सागर सिमेंट व एम के फाउंडेशन च्या वतीने एक लाख वही वाटप शुभारंभ करण्यात आला.

मागील अनेक वर्षांपासून सागर सिमेंट व एम के फाऊंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी लाखो वह्यांचे वाटप करण्यात येत आहे, दरवर्षीप्रमाणे ह्या २०२५-२६ शैक्षणिक वर्षाकरिता १ लाख वह्या वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ मंगळवारी सागर सिमेंट कार्यालय विजापूर रोड सोलापूर येथे जिल्हा प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रातिनिधीक स्वरूपात वह्या वाटप करून शुभारंभ करण्यात आला.
दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली , यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
“गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवून आपण दरवर्षी वह्या वाटपाचे आयोजन करत असून, वही वाटपाचे हे कार्य काही विशिष्ट काळासाठीच चालू केले नसून, हे कार्य माझ्या हातून माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत अखंड कायमच चालू राहील व विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याच्या कार्यात माझा खारीचा वाटा कायमच असेल, ह्या सर्व कार्यात माझ्या कंपनी मॅनेजमेंट व वरिष्ठांचा भक्कम पाठिंबा राहिला आहे त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो” असे प्रतिपादन ह्यावेळी सागर सिमेंट महाराष्ट्र मुख्य व्यवस्थापक तथा एम के फाऊंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे यांनी केले….
कार्यक्रम प्रसंगी सागर सिमेंटचे सेल्स प्रमोटर आनंद लोणावत, सागर सिमेंट चे डीलर सोमनाथ हासाळे, शिवलाल हरळेकर, रमीज साबुनगर, प्रकाश करपे, मल्लेशी मंदोली, रमेश कलशेट्टी, एस के बिराजदार प्रशालेचे मुख्याध्यपक गुरुनाथ वांगीकर, हरिभाई शाळेचे मोतीबन्ने काशिनाथ भातगुणकी, सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाचे नागेश बिराजदार, मल्लिकार्जुन धारसंगे, कलप्पा हंगरगी, राजकुमार दिंडुरे, बसवराज बाके, सुरेश ढवले, प्रकाश राचेट्टी , अशोक बगले ,आप्पाशा हंचनाळ तसेच सागर सिमेंटचे अधिकारी, विविध शाळेचे विद्यार्थी, शिक्षक तसेच एम के फाउंडेशन चे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबूगौडा बिराजदार यांनी केले तर आभार शिवाजी राठोड यांनी मांडले.

 

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *