शाहरुखचा एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना शाबासकी; आयुक्त अमितेश कुमारांकडून 1 लाख रुपयांचे बक्षीस
पुणे : पुण्यातील सराईत गुंड शाहरुख शेख उर्फ अट्टी याचा सोलापुरात भल्या पहाटे एन्काऊंटर करण्यात आला होता. पुणे (Pune) पोलिसांच्या दप्तरी अनेक गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराचा सोलापुरातील लांबोटीजवळ पुणे गुन्हे शाखेनं एन्काऊंटर केला.
शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख (वय 23) याला गंभीर अवस्थेत सोलापूर (Solapur) येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. या घटनेनं पुणे आणि सोलापुरात खळबळ उडाली होती. आता, शाहरुखचा एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना शाबासकी देण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून ज्या पोलिसांनी शाहरुख शेखचा एन्काऊंटर (Encounter) केला, त्यांना 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. शाहरुख हा सराईत गुन्हेगार होता. 2011 पासून आजतागायत त्याच्यावर एकूण 15 गंभीर गुन्हे दाखल होते. त्यामुळे, त्याच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हा देखील करण्यात आली होती. शाहरुखचा एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेला हे बक्षीस देऊ केले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट 6 च्या पथकाला आयुक्तांकडून बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. शाहरुख शेख हा सराईत गुंड असून त्याच्यावर खून, दरोडा, गोळीबार यासारखे अनेक गुन्हे दाखल होते. पोलिसांना गुंगारा देऊन तो सोलापूरमध्ये लपून बसला होता. सोलापूरमध्ये शाहरुख त्याच्या नातेवाईकांकडे लपून बसल्याची माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. गुन्हे शाखेच्या युनिट 6 चे पथक सोलापूरमधील लांबोटी या गावात गेले आणि थेट शाहरुखच्या घरावर पोहचले. त्यावेळी, शाहरुख आणि पोलिसांमध्ये चकमक झाली, त्या चकमकीत पोलिसांकडून शाहरुखवर गोळीबार करण्यात आला. स्वसंरक्षणार्थं पोलिसांनी शाहरुखच्या दिशेने गोळ्या झाडल्या, या एन्काऊंटर मध्ये शाहरुखला 4 गोळ्या लागल्या आणि यात त्याचा मृत्यू झाला होता.
Leave a Reply