सुभाष देशमुखांना धक्का! राजेश काळेंचा सोमनाथ वैद्य यांना पाठिंबा
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीसोबत महायुतीत देखील इच्छुकांची संख्या वाढताना पहयाला मिळतेय. एकवेळ सुभाष देशमुख हेच भाजपकडून उमेदवार असतील अशी चर्चा होती. पण आता यात इच्छुकांची भर पडत असल्याचं चित्र आहे. दोन दिवसापूर्वी भाजपाच्या माजी सभागृह नेत्यांसह सहा नगरसेवकांनी भाजपाचे इच्छुक उमेदवार एडवोकेट सोमनाथ वैद्य यांना पाठिंबा दिला होता. आता भाजपाचे माजी उपमहापौर व दक्षिण विधानसभा क्षेत्रातील आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेले राजेश काळे यांनी आज इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य यांना पाठिंब्याचा पत्रच दिलय या संदर्भात अधिक माहिती राजेश काळे यांनी राजनीति न्यूज चॅनलशी बोलताना दिले आहेत पहा…
Leave a Reply