भाजप आमदार नाचताना खाली पडले
गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल
गणरायाला निरोप देताना भाजप आमदार सुरेश भोळे कार्यकर्त्याच्या खांद्यावरून खाली पडल्याचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जळगाव शहरात मोठ्या उत्साहात गणपती विसर्जन मिरवणूक काढण्यात आल्या होत्या. या मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन, जळगावचे आमदार सुरेश भोळे हे देखील सहभागी झाले होते. गिरीश महाजन यांनी गाण्याच्या तालावर ठेका धरला होता. आमदार सुरेश भोळेही त्यामध्ये सामील झाले. एका कार्यकर्त्यानं आमदार भोळे यांना खांद्यावर घेण्याचा प्रयत्न केला. पण, भोळे यांना खांद्यावर घेऊन उभे राहत असतानाच तोल गेला आणि भोळे खाली पडले. यावेळी आजूबाजूच्या लोकांना त्यांना पटकन हात दिला आणि उभे केलं.
Leave a Reply