इंगळगीच्या तंटामुक्त अध्यक्षपदी भुताळीबाबा गाडेकर यांची निवड!

इंगळगीच्या तंटामुक्त अध्यक्षपदी भुताळीबाबा गाडेकर यांची निवड!

इंगळगी गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते भुताळीबाबा गाडेकर यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

इंगळगी ग्रामपंचायतीच्यावतीने मंगळवार, दि. 18 सप्टेंबर 2024 रोजी सरपंच विनोद बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामसेविका एस. जी. नरोळे यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. त्यानंतर तंटामुक्त अध्यक्षपदासाठी गावकऱ्यांनी भुताळीबाबा गाडेकर यांचे नाव सुचविले. सर्वांच्या अनुमतीने सरपंच विनोद बनसोडे यांनी त्यांची निवड जाहीर केली. यावेळी उपसरपंच गोदावरी प्रधान गुरव, मल्लिकार्जुन नरूटे, इंद्रजीत माने, गोरख माळी, सागर धुळवे, बसवराज गाडेकर, भीमाशंकर बंदीचोडे, सुलतानी कोटे, राहुल कोटे, अमर माने, बसवराज गंभीरे, रविकांत घोडके, रेवणा स्वामी, सलीम शेख, सतीश वंजारे आदी उपस्थित होते.

सर्वांना सोबत घेऊन गावच्या विकासासाठी तसेच तंटामुक्त गावच्या अभियानासाठी आपण काम करणार असल्याचे निवडीनंतर बोलताना नूतन अध्यक्ष गाडेकर यांनी  सांगितले.

इंगळगी गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव अध्यक्षपदी भुताळीबाबा गाडेकर यांची निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार करताना सरपंच विनोद बनसोडे, प्रधान गुरव, इंद्रजीत माने, सागर धुळवे, भीमाशंकर बंदीचोडे, सुलतानी कोटे आदी.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *