शोभादेवी नगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.
मिशन युवा क्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने नई जिंदगी परिसरातील शोभादेवी नगर येथे
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून नई जिंदगी पोलीस चौकीचे PSI महेंद्र गाढवे साहेब यांच्या हस्ते फिती कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष इरफान मैंदर्गी यानी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले,
या कार्यक्रमाला नई जिंदगी येथील युवा कार्यकर्ते मुद्दसर पटेल,
विरभद्र महिला मंडळाच्या संस्थापिका संगिताताई बिराजदार मॅडम,
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक गटाचे बाळासाहेब गायकवाड, प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलचे युवा पत्रकार शाहनवाज शेख,
समाजसेवक किशोर गायकवाड,
हल्लाबोल न्यूज चॅनलचे संपादक युनूस भाई अत्तार,इम्रान शेख,अब्दुल रहमान आदींनी सहभाग नोंदवला,
या फूड फेस्टिवल स्पर्धेला शालेय विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या उत्तम स्वादिष्ट चवदार खाद्य पदार्थांचे स्टॉल लावून कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांचे मने जिंकली,
या कार्यक्रमाचे आयोजक इरफान मैंदर्गी व अनवर शेख यांच्या विशेष प्रयत्नाने कार्यक्रम आयोजन करण्यात आला,
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेले इरफान मैंदर्गी,अनवर शेख,संदेश चितारे,अनवर दामाद आदींनी परिश्रम घेतले..`
Leave a Reply