नीट’मध्ये ‘बाकलीवाल’चे मुजावर, कैरमकोंडा अव्वल, विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करुन मिळवलं यश

नीट’मध्ये ‘बाकलीवाल’चे मुजावर, कैरमकोंडा अव्वल, विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करुन मिळवलं यश

सोलापूर : वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर होताच सोलापुरातील बाकलीवाल टिटोरियल्सने आपल्या दर्जेदार मार्गदर्शनाची परत एकदा छाप
उमटवली आहे. यावर्षी अनेक विद्यार्थी उज्ज्वल यश मिळवून पुढील वाटचालीस सज्ज झाले आहेत.
मुजीब मुजावर याने ५१७ गुण मिळवत सोलापूरमध्ये आपली छाप सोडली आहे. श्रीमाल्पदा कैरमकोंडा हिने ५०२ गुण मिळवत दुसऱ्या क्रमांकावर आपले स्थान निश्चित केले आहे. याचबरोबर बाकलीवालचे १७ विद्यार्थी ४०० हून अधिक गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये प्रांजली औरादे ४९० आशीकली मुलानी ४७८, जेबा नदाफ ४५०, संस्कृती मिरेकर ४४२, फातिमा पठाण ४३८, सूरज तसीलदार ४३५, वैष्णवी व्यवहारे ४३४, प्राची चव्हाण ४३१, राजेश्वरी साळुंखे ४२१, वीराक्षी महिंद्रकर ४२१, स्वाती सहानी ४२०, मयूरेश अहंकारी ४१२, रेहान नल्लामंदू ४११, संकेत जिडगे ४०५, स्नेहा हिरेमठ ४०० यांचा समावेश आहे. ४४ विद्यार्थ्यांनी ३०० पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत. संस्थेचे उत्कृष्ट नियोजन, अनुभवी शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमामुळे हे यश शक्य झाले आहे.
Dailyhunt

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *