सोलापुरातील कुंभारी गावात 7-8 अज्ञात तरुणांकडून एसटी बसची तोडफोड

सोलापुरातील कुंभारी गावात 7-8 अज्ञात तरुणांकडून एसटी बसची तोडफोड

– पुण्यातील स्वारगेटहून अक्कलकोटकडे निघालेल्या एसटीची आंदोलकाकडून तोडफोड
– धक्कादायक बाब म्हणजे एसटीची काच फोडल्यानंतर चालक आणि प्रवासी खाली उतरवून एका आंदोलकाने चक्क एसटी स्वतः चालवत कुंभारी गावात नेली
– काही अंतरावर ही एसटी थांबवून पुन्हा प्रवासी सीट शेजारी असलेल्या काचा देखील फोडण्यात आल्या
– सोलापुरातील कुंभारी गावाजवळ घडलेला हा सगळा प्रकार आहे
– आंदोलकांकडून गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याची माहिती
– घटनेची माहिती मिळताच पोलीस कुंभारी गावात पोहोचले असून गाडीतील प्रवाशांना दुसऱ्या गाडीने अक्कलकोटला रवाना केलं आहे
– या गाडीत जवळपास 35 प्रवासी हे स्वारगेटहुन अक्कलकोटच्या दिशेने निघाले होते
– या सर्व प्रवाशांना दुसऱ्या एसटीने अक्कलकोटला पाठवलं असल्याची प्रशासनाची माहिती
– वळसंग पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू

 

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *