सांघिक खेळातून ग्रामीण भागातील युवा खेळाडू आपली योग्यता दाखवावी: माजी नगरसेवक लक्ष्मण काका जाधव
श्री अमोगसिध्द महाराज यात्रेनिमित्त भव्य फुल पिच टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन..
रविवार २०एप्रिल 2025 रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी येथील ग्रामदैवत श्री अमोगसिध्द महाराज यात्रेनिमित्त भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचे सुरूवात करण्यात आली ही स्पर्धा शिवसेना उबाठा गटाचे दक्षिण सोलापूर तालुकाप्रमुख रविकांत घंटे यांच्या शेतात आयोजित करण्यात आला आहे
भव्य फुल पिच टेनिस क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक शिवसेना उबाठा दक्षिण शहर प्रमुख लक्ष्मण काका जाधव उबाठा गटाचे नुतन दक्षिण सोलापूर तालुकाप्रमुख रविकांत घंटे कंदलगाव चे युवा नेते हणमंत भाऊ सलगरे समर्थ पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत कापसे सोहेल भाईजी नदाफ यांच्या हस्ते क्रिकेट मैदानाचे पुजन करूण करण्यात आले तसेच काही दिवसांपूर्वी मनगोळी गावचे ज्ञानेश्वर भोई यांचे दुःखद निधन झाले होते त्यांनाही त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली.
या स्पर्धेचे प्रथम बक्षीस 21हजार 21रुपये असुन हे रोख बक्षीस सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक शिवसेना उबाठा गटाचे नुतन दक्षिण शहर प्रमुख लक्ष्मण काका जाधव यांच्याकडुन ठेवण्यात आले आहे.
या स्पर्धेचे द्वितीय पारितोषिक कंदलगाव चे युवा उद्योजक हणमंत भाऊ सलगरे यांच्याकडून 15हजार 15 रूपये देण्यात येणार आहे.
तसेच तृतीय पारितोषिक सामाजिक कार्यकर्ते युवा नेते सोहेल (भाईजी) नदाफ यांच्या कडून रोख 11हजार 111रूपये देण्यात येणार आहे.तसेच प्रथम द्वितीय आणि तृतीय विजेता संघास समर्थ पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत कापसे यांच्या कडून देण्यात येणार आहे.
जवळपास सोलापूर ग्रामीण भागातून अनेक संघाने या क्रिकेट स्पर्धस आपला सहभाग नोंदविला आहे.
स्पर्धेत वरील बक्षीसास अनेक वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी बुड्डा शेख,सुभाण तांबोळी,गोरख रणदिवे रफिक नदाफ सुरज आयवळे, ओंकार कापसे, यांच्यासह यशस्वी क्रिकेट क्लब मनगोळी चे सर्व सदस्य मंडळी आणि या क्रिकेट स्पर्धेचे आनंद घेण्यासाठी अनेक क्रिकेट प्रेमींनी उबाठा गटाचे नुतन दक्षिण सोलापूर तालुका प्रमुख रविकांत घंटे यांच्या शेतात मैदानावर मोठी गर्दी केली होती.
Leave a Reply