शिवसेना उबाठा गटाच्या दक्षिण तालुकाप्रमुखपदी मनगोळीचे रविकांत घंटे..
शिवसेना ठाकरे पक्षाच्या दक्षिण सोलापूर तालुकाप्रमुखपदी मनगोळीचे रविकांत घंटे यांची निवड करण्यात आली आहे.
सीना आणि भीमा नदीत व कालव्यात उजनी धरणातून पाणी सोडावे यासह विविध प्रश्नांवर त्यांनी आंदोलन केले आहे. त्यांचे कार्य पाहून जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांनी ही निवड केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे विचार आणि पक्षांची ध्येयधोरणे पोहोचविण्यासाठी काम तळागाळापर्यंत आपण करणार आहोत. गावोगावी शिवसेनेच्या शाखा काढून आगामी स्थानिक निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी माजी नगरसेवक लक्ष्मण जाधव उपस्थित होते.
ते लोकप्रधान न्युज चॅनल चे दक्षिण सोलापूर तालुका प्रतिनिधी नारायण घंटे यांचे लहान बंधू आहेत.
Leave a Reply