राष्ट्रीय खेळाडू पोलीस हवालदार असिफ मुजावर यांचे निधन
सोलापूर – राष्ट्रीय स्पर्धेत दोनदा सुवर्णपदक विजेते, जेलरोड पोलीस ठाण्यातील पोलीस हवलदार आसिफ महेबूब मुजावर (वय 41 वर्ष, रा. 14 आदर्श नगर, लक्ष्मीनारायण टॉकीज मागे, एमआयडीसी रोड, सोलापूर ) यांचे अल्पशा आजाराने आज रविवारी रात्री पावणे नऊ वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या सोमवारी सकाळी दहा वाजता राहत्या घरापासून काढून अक्कलकोट रोड येथील जडेसाब मुस्लिम कब्रस्तान येथे दफन विधी करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी ,चार भाऊ असा परिवार आहे. ते सर्वांशी हसतमुख व प्रेमळ स्वभावाचे होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Leave a Reply