दक्षिण सोलापूर मनगोळी येेथील श्री अमोगसिध्द देवाची यात्रेची भारुडाने सांगता..
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी येथील ग्रामदैवत श्री अमोगसिध्द महाराज यात्रेची सुरुवात 20 एप्रिल 2025पासुन झाला होता.
यामध्ये उत्तर सोलापूर तालुक्यातील नंदूर गुरू सोमनिंग मनगोळी गावचे अमोगसिध्द महाराज दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकवठे गावचे श्री महासिध्द उत्तर सोलापूर तालुक्यातील सोरगावचे मलकारसिध्द महाराज मनगोळी गावची ग्रामदेवता लकव्वादेवी या पाच देवाच्या पालखीचे भेटीचा कार्यक्रम संपन्न झाला.
त्यानंतर सायंकाळी मनगोळी गावचे सरपंच प्रतिनिधी तथा सामाजिक कार्यकर्ते संजय गायकवाड यांच्या कडून यात्रेस येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
सरपंच प्रतिनिधी तथा सामाजिक कार्यकर्ते संजय गायकवाड यांचे यात्रेस येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद वाटपाचे ही निरंतर पाचवे वर्ष आहे.
रात्री ठिक 9वाजण्याच्या सुमारास जंगी जुगलबंदी भारूडाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यामध्ये अक्कलकोट तालुक्यातील हालचिचोंली चे हभप माहनतेस घंटे महाराज, दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजेगावचे हभप शिवाजी महाराज पवार, दक्षिण सोलापूर तालुक्यातील हिपळे गावचे हभप बलभीम महाराज गावडे, कृष्णा महाराज माने, दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी स्टेशन चे दयानंद चोपडे यांची जुगलबंदी भारूडाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या भारुड रुपी सेवेला तबल्या साठी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर चे राहुल परीट, कंदलगाव चे तुकाराम गेजगे तसेच हार्मोनियम दत्तात्रय घंटे हभप अभिमान महाराज घंटे, गणेश कोळेकर प्रभुलिंग सर्वगोड अगंद पवार यांची साथ लाभली.
21एप्रिल 2025 रोजी पहाटे पासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
त्यानंतर पहाटे पासून अमोगसिध्द महाराज मंदिरात नैवेद्य दाखवण्यासाठी यांनी दर्शनासाठी घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झालेली होती
या यात्रेस आलेल्या भाविकांना अमोल धनवे पाटील यांच्या कडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळेस, अमोगसिध्द महाराज देवाचे पुजारी यामध्ये भीमा पुजारी बिरु पुजारी,मलका पुजारी, चंद्रकांत पुजारी,दादा पुजारी,बेळ्ळुसिध्द पुजारी,औदु पुजारी आप्पा पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री अमोगसिध्द महाराज यांची यात्रा यशस्वी करण्यासाठी श्री अमोगसिध्द महाराज यात्रा पंच कमिटी व समस्त मनगोळी ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभले.
Leave a Reply