शोभादेवी नगरचा तरुण बनला तहानलेल्या साठी देवदूत…!
सोलापूर शहरात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने याचा फटका नई जिंदगी परिसरातील शोभादेवी नगर येथील नागरिकांना देखील बसत असल्याने या परिसरात देखील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्था व्यवस्थित होत नसल्यामुळे परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र पाहून शोभादेवी नगर येथील समाजसेवक अनवर शेख यांनी रात्रीच्या वेळेस थेट सोलापूर महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष अतिरिक्त आयुक्त श्री.संदीप कारंजे यांना फोन करून पिण्याच्या पाण्याची टंचाईमुळे परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय बाबत नाराजगी व्यक्त केली,
व नेहमी प्रमाणे नगरी समस्यांना तातडीने प्राधान्य देऊन समस्यांचे निवारण करण्यासाठी प्रयत्नशील असणारे अतिरिक्त आयुक्त श्री संदीप कारंजे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना याची कल्पना देऊन पिण्याचे पाणी पुरवठा सुरळीत होई पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात का होईना मार्ग काढू अशी ग्वाही दिली,
व दुसऱ्या दिवशी पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या नागरिकांसाठी टँकर पाठवून दिले,
परिसरात पिण्याच्या पाण्याचे टँकर आल्याने नागरिकां मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले,
तात्पुरत्या स्वरूपात का होईना पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिल्याने शोभादेवी नगर परिसरातील नागरिकांनी समाजसेवक अनवर शेख यांचे आभार व्यक्त केले..
Leave a Reply