चोपड्यात सात गावठी कट्टे व दहा जिवंत काडतुसासह दोन लाख 90 हजार रुपयांच्या मुद्देमाल पोलिसांकडून जप्त
जळगावच्या चोपड्या तालुक्यात सात गावठी कट्टे व दहा जिवंत काडतुस सापडली असुन पोलीसांनी २ लाख ९० हजारांचा मुद्दमाल जप्त केला आहे.
उमर्टी कडून मोटरसायकलवर दोन जण गावठी कट्टा घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळाल्याने त्यांनी लासूर हातेड रस्त्यावर सापळा रचला. मोटर सायकल वर येणाऱ्या इसमाची तपासणी केली असता त्यांच्याकडे गावठी कट्टे व जिवंत काडतुस मिळून आले. चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सात गावठी कट्टा जिवंत काडतुस सह मोटर सायकल असा दोन लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी दिली.
Leave a Reply