महायुतीकडून अपक्षांना पैशांच्या थैल्या पाठवल्या जात आहेत – संजय राऊत

महायुतीकडून अपक्षांना पैशांच्या थैल्या पाठवल्या जात आहेत – संजय राऊत

– जे सर्व्हे करतात त्यांच्या ऐशी की तैशी, महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकेल
– जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल देसाई यांच्यासोबत आम्ही काल सर्व जण बसलो यावर चर्चा झाली
– 160 जागा आम्ही सहज जिंकू
– एक्झिट पोलवर आमचा विश्वास नाही

ऑन अपक्ष
– सरकार मजबूत करायचं असेल तर जिथे सत्ता असते तिथे अपक्ष येतात
– आमच्याबरोबर डावी पक्ष आहेत शेकाप आहे
– हे सर्व महाविकास आघाडीचे घटक आहेत
– काही अपक्षाने पाठिंब्याची इच्छा व्यक्त केली आहे
– जे पैशांचे बंडल डोक्याखाली ठेवून झोपतात त्यांना 50 -100 कोटीची ऑफर अपक्षांना केली आहे
– त्यांना जिंकण्याची अपेक्षा आहे म्हणून अपक्षांना बंडलांच्या थैल्या पाठवल्या जात आहेत आत्तापासून
– भाजपाच्या जागा कशा वाढतात हे निवडणूक आयोगाने आम्हाला समजावून सांगावं, मार्गदर्शन करावं

ऑन महिला मतदान
– महिलांच्या मतदानाचा टक्का वाढला असेल तर आम्ही त्याचं स्वागतच करतो, लाडक्या बहिणीची मतं तुम्ही विकत घेतली आहेत का?
– उद्या कळेल, लोकशाहीमध्ये सांगण्याचा बोलण्याचा स्वतंत्र आहे
– जेवढं गौतम अदानी यांना स्वतंत्र आहे, गुन्हे करून सुटण्याचं तितकं सर्वांचा आहे

ऑन प्रकाश आंबेडकर
– प्रकाश आंबेडकर लोकशाही मानणारे नेते आहेत, त्यांचे 50- 60 आमदार निवडून येत असतील तर नक्की त्यांचा आम्ही विचार करू
– लोकसभेत आम्ही त्यांच्या सोबत राहण्याचा प्रयत्न केला, विधानसभेतही केला, त्यांचं असं म्हणणं आहे ज्यांची सत्ता येणार त्यांच्यासोबत राहणार आमची सत्ता येत आहेत तर ते आमच्या सोबत राहणार

ऑन सत्ता स्थापन
– राष्ट्रपती राजवटी बद्दलचा हा भाजपचा डाव आहे, उद्या निकाल लागेल आणि मग 24-25 तारखेला येथे आमदार पोहोचतील बैठका होतील विधिमंडळ पक्षाचे नेते निवडले जातील,
– केंद्रीय गृह मंत्रालयात भाजपाचा कारभार असल्यामुळे आणि राजभवनात त्यांची शाखा असल्याने ते आम्हाला अडथळे आणण्याचा प्रयत्न करणार
– आमच्या हातात बहुमत आलं तरी राष्ट्रपती राजवटीचा प्रयत्न करतील, पण आम्ही महाविकास आघाडीच सरकार स्थापन करू,सरकार स्थापन करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही
– आमचे निवडून आलेले आमदार मुंबईत आणणं गरजेचं आहे
– ग्रामीण भागातील नवीन निवडून आलेले आमदार मुंबईत राहणार

ऑन गुलाबराव पाटील
– त्या ठिकाणी गुलाबराव देवकर जिंकून येत आहेत, त्या ठिकाणी राष्ट्रवादीची तुतारीच वाजेल त्यामुळे त्यांचीच गरज पडणार नाही, सरकार स्थापनेला त्यांची गरज असेल की नाही माहित नाही हे त्यांनी ठरवावं

ऑन ग्रँडहयात बैठक जयंत पाटील ड्राइव्हिंग
– महाविकास आघाडी ही स्वबळावर सत्तेत येणार आहे आणि त्यातील गाडीत बसलेले आहेत ते सर्व ड्रायव्हर निषणात ड्रायव्हर आहे सार्थी आहे
– जयंत पाटील हे उत्तम ड्रायव्हर आहेत त्यांना उत्तम वाहन चालवता येतं हा माझा अनुभव आहे, काही लोकांना ड्रायव्हिंग फॅशन असतं
– जयंत पाटील हे उत्तम राज्य चालवू शकतात. उद्धव ठाकरे यांना देखील अनुभव नव्हता तरी देखील त्यांनी सरकार चालवलं

ऑन नाना पटोले
– मी असं म्हणालो सरकार स्थापनेबाबत चर्चा झाली, नाना पटोले काय म्हणतात त्याबद्दल माझी उलट तपासणी घेऊन नका

ऑन सोलापूर वाद
– दक्षिण सोलापूरची जागा ही शिवसेनेला अधिकृत सुटल्यावर महाविकास आघाडीच्या सर्व जणांनी काम करणे अपेक्षित होत, महाराष्ट्रात काही ठिकाणी असे प्रकार झाले,काही अपवाद आहेत उद्या निकाल लागल्यावर एकत्र बसून चर्चा करू
का घडतंय हे तपासून पहावं लागेल
– लोकं का संतापले आहेत याबद्दल माहिती घ्यावी लागेल

ऑन मुख्यमंत्री कोण
– उद्या दहा नंतर मी सांगणार कोण मुख्यमंत्री असणार ते
– महिलांनी गुलामी विरोधात बंड करून मतदान केलेल आहे
– 160 जागा आम्ही जिंकतो आहे यावर आमची सर्वांसोबत चर्चा झाली, आज मी शरद पवार यांना भेटण्याची शक्यता आहे.. 160 जागा जिंकल्यावर राज्यपालांनी कितीही प्रयत्न केले तरी निवडणूक पूर्व त्यांच बहुमत आहे त्यांना राज्यपालांना बोलवावं लागेल
– महाराष्ट्रात जे नेते दिल्लीतून येतील त्यांना मँडेड घेऊनच यावं लागेल ,कुठलाही वेळ न घालवता आम्हाला निर्णय घ्यावा लागेल , नाहीतर भाजप घाई घाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवतील
– एकनाथ शिंदे मणिपूरला जातील आमदारांना घेऊन,तिथे गौतम अदानी यांनी दोन-चार रिसॉर्ट बांधलेले आहेत

 

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *