दोन तालुक्यांना जोडणारा नाला पाण्याखाली, कंबरेभर पाण्यातुन जिवघेणा प्रवास….

दोन तालुक्यांना जोडणारा नाला पाण्याखाली, कंबरेभर पाण्यातुन जिवघेणा प्रवास….

सोलापूर जिल्हयातील दोन तालुक्यांना जोडणारा नाला पूर्णतः पाण्याखाली गेल्याने दक्षिण व उत्तर सोलापूरला जोडणारा रस्ताच बंद झाला. उत्तर सोलापूर मधील दहीटणे व दक्षीण सोलापूर मधील बक्षीहिप्परगा गावाला जोडणारा नैसर्गिक नाला दुथडी भरून वाहत आहे तर या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या शेतकरी, कामगार, व गावकऱ्यांना पर्यायी मार्गाचा वापर कराव लागत आहे. गावा जवळ व नाल्याच्या आसपास शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनी मात्र एका हातात पादूके व दुसर्या हातात भाकरीचा फडका घेत कबंरेभर वाहत असलेल्या पाण्यातुन वाट काढत आपला शेत गाठला. तर बक्षीहिप्परगा गावातील शालेय विध्यार्थी व कामगार वर्ग आज वाहत असलेल्या नल्याच्या पाण्याला बघून सूट्टी घेण्याचा निर्णय घेत आल्या मार्गाने घरीच परतले. पर्यायी मार्ग हा लाबंचा पट्टा असल्याने किमान 5 ते 7 किलोमीटर अंतरचा फरक पडत असल्याने बक्षीहिप्परगा येथील विद्यार्थांना व कामगारांना हा प्रवास परवडणार नसलयाने मानसिक व आर्थिक त्रास सोसाव लागत आहे. जिव मूठीत घेऊन वाहत्या पाण्यातुन प्रवास करणारे शेतकरी व गावकरी कसा प्रवास करतात पहा.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *