राज्यात तब्बल 25 हजार शिक्षक अतिरिक्त ग्रामीण शिक्षण व्यवस्था कोलमडणार; नवी संच मान्यता रद्दची मागणी
जुन्या संच मान्यतेनुसार राज्यात जवळपास 25 हजार शिक्षकांच्या जागा रिक्त होत्या. नव्या संच मान्यतेमुळे राज्यात 25 हजार शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. ही नवी संच मान्यता लागू केल्यास ग्रामीण शिक्षण व्यवस्था कोलमडणार आहे. त्यामुळे नवी संच मान्यता रद्द करण्याची मागणी राज्यातील शिक्षकांतून होत आहे.
राज्यातील जिल्हा परिषद शाळांच्या नवीन संच मान्यतेमुळे अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांची नोकरी अडचणीत आली आहे. त्यामुळे प्रहार शिक्षक संघटनेने नवीन संच मान्यतेस न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने नवीन संच मान्यतेस तूर्तास स्थगिती दिली आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
नवीन संच मान्यता अन्यायकारक
राज्यातील जिल्हा परिषद शाळांची संच मान्यता गंभीर विषय आहे. नवीन संच मान्यतेचे अन्यायकारक धोरण रद्द करण्यासाठी आ.बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहार शिक्षक संघटनेने शासनास निवेदने दिली. ग्रामीण शिक्षण व्यवस्था मोडीत काढण्याचे हे धोरण आहे. त्यामुळे ते रद्द करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नोकरीवर गदा येण्याची शक्यता
सन 2023-24 च्या संच मान्यतेनुसार राज्यात शिक्षकांच्या 25 हजार जागा रिक्त होत्या. नव्या संच मान्यतेनुसार 25 हजार शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. शिक्षक, पालकांमध्ये नवीन संच मान्यतेविषयी जनजागृती नाही. शासनाने काढलेल्या नव्या संच मान्यतेमुळे राज्यातील हजारो शिक्षकांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे.
या कारणामुळे शिक्षक अतिरिक्त ठरू शकतात
Leave a Reply